दर कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 00:53 IST2021-03-01T00:52:39+5:302021-03-01T00:53:43+5:30

निफाड तालुक्यासह शिरवाडे वणी परिसरात ऑक्टोबर महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्षाच्या काढणीला वेग आला असून, प्रतिवर्षाच्या तुलनेत या वर्षी द्राक्षाचे बाजारभाव कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त दिसून येत आहे.

Grape growers worried about falling prices | दर कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंतित

दर कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंतित

ठळक मुद्देशेती व्यवसायाला घरघर : खते, मजुरीच्या खर्चामुळे आर्थिक पेच

शिरवाडे वणी : निफाड तालुक्यासह शिरवाडे वणी परिसरात ऑक्टोबर महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्षाच्या काढणीला वेग आला असून, प्रतिवर्षाच्या तुलनेत या वर्षी द्राक्षाचे बाजारभाव कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त दिसून येत आहे.
निफाड तालुक्याचा उत्तर-पूर्व भाग हा द्राक्ष उत्पादन निर्मितीमध्ये अग्रेसर असून, द्राक्षाचे पीक हे प्रमुख नगदी पीक  व परकीय चलन मिळवून देणारे एक असले तरी सध्याच्या मिळत असलेल्या कोसळत्या बाजारभावामुळे आता ते भरवशाचे पीक राहिले नाही. परिसरातून स्थानिक बाजारपेठेपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये शेतकरी तसेच व्यापारी द्राक्षे पाठविण्याचे काम करीत असतात. मागील वर्षी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर खर्च अधिक व उत्पादन शून्य झाले असून, यावर्षीसुद्धा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे.
सद्य:स्थितीत स्थानिक बाजारपेठाअंतर्गत द्राक्षाला २० ते २५ रुपयांपर्यंत भाव मिळत असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठअंतर्गत निर्यातक्षम प्रतीच्या द्राक्षाला ३० ते ४० रुपयांपर्यंत इतकाच भाव मिळत असल्यामुळे त्यापासून मिळणारे उत्पन्न हे खर्च वजा जाता काहीच नसल्यामुळे तसेच द्राक्षपीक हे दिवसेंदिवस मजुरीचे वाढते दर, औषधे व खतांचे खर्च यामुळे अतिशय खर्चिक होत आहे. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत हे पीक  परवडेनासे झाले आहे. या बाबीतून सावरण्यासाठी तसेच शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व शेती व्यवसायाला गतवैभव प्राप्त होण्यासाठी स्थानिक पातळीपासून शासनापर्यंत आर्थिक बळ देणे गरजेचे आहे. परिणामी अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतीव्यवसायाला नित्याचीच घरघर लागली आहे.

Web Title: Grape growers worried about falling prices