गारपिटीमुळे द्राक्षबागांना रोगाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:25 AM2018-06-05T01:25:24+5:302018-06-05T01:25:24+5:30

मान्सून मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्याने शहर व जिल्हा परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, त्यामुळे पिकांवर रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषत: या ढगाळ वातावरणाचा द्राक्षपिकाला रोगराईचा धोका निर्माण झाला आहे.

 Grape Disease Disease | गारपिटीमुळे द्राक्षबागांना रोगाचा धोका

गारपिटीमुळे द्राक्षबागांना रोगाचा धोका

Next

नाशिक : मान्सून मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्याने शहर व जिल्हा परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, त्यामुळे पिकांवर रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषत: या ढगाळ वातावरणाचा द्राक्षपिकाला रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर पावसापासून कांदा वाचवण्याचे संकट उभे ठाकले असतानाच वादळी पाऊस आणि गारपिटीपासून फळभाज्या व पालेभाज्या वाचविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.  मान्सून आगमनाच्या काळात होणाºया गारपिटीमुळे पाने फाटणे, हिरव्या काडीवर जखमा होण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे जिवाणू करपा किंवा मोट्रीओडिप्लोडियासारख्या बुरशा काडीमध्ये वाढण्याची शक्यता असते. द्राक्ष उत्पादक शेतकºयांसमोर अशाप्रकारे करपा नियंत्रणाचे आव्हान असताना, कांदा उत्पादक व फळभाज्या-पालेभाज्या उत्पादक शेतकरीही संकटात आहे. मान्सूनचा पाऊस तोंडावर आलेला असताना भाव वाढण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकºयांना कांदा साठविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे, तर फळभाज्या व पालेभाज्यांना गेल्या जानेवारी महिन्यापासून समाधानकारक बाजारभाव न मिळाल्याने शेतकºयांनी संपाचे अस्त्र उपसले असून, त्यामुळे १ व २ जून रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील संपूर्ण व्यवहार कोलमडल्याचे दिसून आले. या संपाच्या झळा अद्यापही कायम असून, सध्या बाजार समितीच्या आवारात काहीसे समाधानकारक भाव मिळत असले तरी ही परिस्थिती कायमस्वरूपी टिकण्यासाठी सरकाने सकारात्मक पाऊले उचलण्याची गरज शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.
संपकाळात तीन कोटींची उलाढाल ठप्प
राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १ व २ जून या दोन दिवसांत जवळपास तीन ते साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. त्यामुळे संपाचा अप्रत्यक्षरीत्या शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फटका सहन करावा लागला. संपामुळे शेतकरी व्यापाºयांसोबतच मालवाहतूकदारांनाही मोठा फटका बसल्याचे दिसून आले. संपाच्या पहिल्या दिवशी बाजारपेठेत केवळ ३० टक्के माल आल्याने मुंबई तथा परराज्यात शेतमाल वाहतूक करणाºया व्यावसायिकांनाही फटका बसला, तर दुस-या दिवशी ३६४ व तिसºया दिवशी ५९२ वाहनांमधून मालाची वाहतूक झाल्याने आता बाजार समिती पूर्वपदावर येत आहे.
कांदा साठविण्याच्या कामाला वेग
उन्हाळ कांद्याला संपूर्ण हंगामात केवळ तीनशे ते सहाशे रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवटच्या टप्प्यात भाव काही प्रमाणात वधारले असले तरी उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळेच १ जूनपासूनच्या संपकाळात शेतकºयांनी कांदा बाजारपेठेत आणणे थांबविले असून, कांद्याचे नुकसान टाळण्यासाठी कांदा साठविण्याच्या कामाला वेग आला आहे. परंतु पुरेशी आणि तंत्रशुद्ध यंत्रणा नसल्याने घरात, गोठ्यात जशी जागा उपलब्ध होईल तसा कांदा साठविण्याची नामुष्की शेतकºयांवर आली आहे.
कांद्याप्रमाणेच जानेवारीपासून टमाटेही कवडीमोल भावाने विकावा लागला. गेल्या काही दिवसांपासून टमाट्याच्या बाजारभावात काही प्रमाणात वाढ झालेली दिसत असताना, शेतकरी संपामुळे बाजार समितीत येणारा माल थांबवला गेल्याने शेतक ºयांना काही प्रमाणात त्याचा फटका बसला. परंतु बाजार समितीतील आवक व लिलावप्रक्रिया पूर्ववत झाल्याने टमाटा उत्पादकांना येत्या काळात चांगला भाव मिळण्याची शक्यता असली तरी वादळी पाऊस व गारपिटीपासून टमट्याचे संरक्षण करण्याचे आव्हान शेतकºयांसमोर आहे.

Web Title:  Grape Disease Disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी