शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित असूनही ग्रामसेवक कामावर हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 01:07 IST

येवला : तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामसेवकास भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन येवला पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून निलंबित करण्यात येऊनही ते कामावर हजर असल्याचे आणि प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याची तक्रार अ‍ॅड. एकनाथ ढोकळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांचीच चौकशी करा, याशिवाय डोंगरगाव ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारात अडकलेल्या सर्वांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणीही ढोकळे यांनी केली आहे.

ठळक मुद्देप्रशासन अनभिज्ञ : डोंगरगाव ग्रामपंचायतीचा कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामसेवकास भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन येवला पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून निलंबित करण्यात येऊनही ते कामावर हजर असल्याचे आणि प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याची तक्रार अ‍ॅड. एकनाथ ढोकळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांचीच चौकशी करा, याशिवाय डोंगरगाव ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारात अडकलेल्या सर्वांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणीही ढोकळे यांनी केली आहे.ढोकळे यांनी तक्रारीत म्हटले आहे, तालुक्यातील डोंगरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. रंजक महाराज ढोकळे यांनी केलेल्या तक्र ारी नंतर याआधीच ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ ग अन्वये येथील चार ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी यांनी निलंबित केलेले असून त्यांचे अपील देखील विभागीय आयुक्त यांनी फेटाळून लावलेले आहे. त्याआधी डोंगरगावला कार्यरत असलेल्या ग्रामसेवक तुपे यांचे देखील प्रशासनाने निलंबन केले होते. याशिवाय, डोंगरगाव येथे रु जू झालेले व पूर्वीचीच निलंबनाची कार्यवाही सुरु असलेले ग्रामसेवक ठोंबरे यांच्यावर ६ लाख ६१ हजार रु पयांचा भ्रष्टाचार केला म्हणून येवला पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी त्यांना निलंबित केले होते. असे असतांनाही हे ग्रामसेवक आजही कामावर हजर आहेत. एवढेच नव्हे तर ते डोंगरगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसमोरील सुनावणीलाही हजर राहिलेले होते. ढोकळे यांनी सुनावणी दरम्यान जेंव्हा ही बाब कार्यकारी अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली तेव्हा ठोंबरे यांच्या निलंबनाबाबत स्वत: ठोंबरे यांनाही माहीत नसल्याचे समोर आले. सुनावणीसाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी, येवला येथील विस्तार अधिकारी अहिरे हे उपस्थित होते, मात्र त्यांनाही या निलंबनाबद्दल काहीही माहिती नसल्याची माहिती त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली. याप्रकरणी निलंबनाचे आदेश देणारे गटविकास अधिकारी यांची चौकशी करावी, अशी मागणी अ‍ॅड. एकनाथ ढोकळे यांनी केली आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद