दहा लाख किमतीची बिबट्याची कातडी हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 17:38 IST2019-01-12T17:37:57+5:302019-01-12T17:38:31+5:30
तस्करी : कळवण तालुक्यातील संशयितास अटक

दहा लाख किमतीची बिबट्याची कातडी हस्तगत
नाशिक : बिबट्याची कातडीची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील भैताणे फाट्यावर सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून सुमारे दहा लाख रुपये किंमतीची बिबट्याची कातडी हस्तगत करण्यात आली आहे.
कळवण तालुक्यातील भैताणे फाट्यावर बिबट्याची कातडी तस्करीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्याच्या आधारे विशेष पथकाचे किशोर अहिरराव, अविनाश गडाख, प्रमोद मंडलीक, कुणाल मराठे आणि वनविभागाचे दशरथ कडाळे या पथकाने सापळा लावला असता भाउराव रामचंद्र गायकवाड (राहणार भैताणे) हा पिशवी घेऊन जाताना आढळून आला. त्याच्या संशयास्पद हालचाली पथकाच्या निदर्शनास आल्याने गायकवाड याची झडती घेउन तपासणी केली असता त्याच्याकडे सुमारे दहा लाख रु पये किमतीची बिबट्याची कातडी आढळून आली. सदरची कातडी कोठुन आणली व विक्रि साठी कोठे जाणार होती याचा तपास सुरु असुन यामागे तस्करीचे मोठे रॅकेटच असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांनी संशयित भाऊराव गायकवाड याला अटक केली आहे.