शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

७३० कोटींच्या निधी खर्चात जि.प. प्रशासन तोंडघशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 8:08 PM

जिल्हा परिषदेचे प्रशासन सध्या अखर्चित निधीवरून आरोपींच्या पिंज-यात उभे असून, त्यातूनच पदाधिकारी व सदस्य विरुद्ध प्रशासनातील अधिकारी असे चित्र निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देनियोजन समितीकडून कानउघडणी : मंजूर नियतव्यय मिळणारटोकन रकमेशिवाय कामांचे कार्यारंभ आदेश न काढणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनास सणसणीत चपराक

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : २०१८-१९ चे आर्थिक वर्ष संपुष्टात येऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी, सुमारे २३० कोटी रुपयांचा निधी अद्यापही अखर्चित राहणे व सन २०१९-२० हे आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यास अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना सुमारे पाचशे कोटींपैकी एक रुपयाही खर्ची न पडण्यामागे गेल्या दीड वर्षापासून जिल्हा परिषद प्रशासन व जिल्हा नियोजन समितीत सुरू असलेल्या चालढकलीमुळे यंदा जिल्हा परिषदेचा मोठ्या प्रमाणावर निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातही जिल्हा नियोजन समितीने दोन दिवसांपूर्वीच मंजूर नियतव्ययाची रक्कम जिल्हा परिषदेला मिळण्यास कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्टीकरण दिल्याने टोकन रकमेशिवाय कामांचे कार्यारंभ आदेश न काढणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनास सणसणीत चपराक बसली आहे.

जिल्हा परिषदेचे प्रशासन सध्या अखर्चित निधीवरून आरोपींच्या पिंज-यात उभे असून, त्यातूनच पदाधिकारी व सदस्य विरुद्ध प्रशासनातील अधिकारी असे चित्र निर्माण झाले आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेची विविध विकासकामे व योजनांसाठी ४६८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असला तरी, सदरचा निधी खर्च करण्यास जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी कमी पडले, परिणामी आर्थिक वर्ष उलटूनही २३० कोटी रुपये अखर्चित पडून आहेत. त्यातच सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी सुमारे पाचशे कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीतून मंजूर करण्यात आले आहेत. विविध कामे व योजनांसाठी या निधीची तरतूद असून त्यासाठी नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. मात्र मंजूर नियतव्यय हातात पडत नाही तोपर्यंत विकासकामांना मंजुरी, प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ न देण्याची नवीन पद्धत अलीकडेच जिल्हा परिषद प्रशासनाने अवलंबली. मुख्य लेखा अधिकारी, तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यासाठी आग्रही भूमिका घेतली. परिणामी ‘टोकन’ रक्कम हातात पडेपर्यंत कामांना कार्यारंभ आदेश वा प्रशासकीय मंजुरीच न देण्याची भूमिका निधी अखर्चित राहण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे पदाधिकारी, सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरण्यास सुरुवात केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने यासंदर्भात जिल्हा नियोजन अधिकाºयांना पत्र पाठवून मार्गदर्शन मागविले

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद