शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
3
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
4
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
5
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
6
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
7
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
8
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
9
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
10
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
11
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
12
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
13
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
14
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
15
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
16
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
17
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
18
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
19
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
20
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. अध्यक्ष- पदाची निवडणूक नियमानुसारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 01:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची चार महिन्यांची मुदतवाढ २० डिसेंबर रोजी संपत असल्याने नवीन अध्यक्ष, पदाधिकारी ...

ठळक मुद्देनवीन पदाधिकाºयांची निवड डिसेंबरच्या अखेरीस

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची चार महिन्यांची मुदतवाढ २० डिसेंबर रोजी संपत असल्याने नवीन अध्यक्ष, पदाधिकारी व विषय समित्यांच्या सभापतींची निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यात यावी, असे घाईघाईने पत्र काढणाऱ्या ग्रामविकास विभागामुळे जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेची धावपळ उडलेली असताना अवघ्या काही तासातच चूक उमगलेल्या ग्रामविकास विभागाने पुन्हा दुसरे पत्र काढून प्रक्रिया कायदेशीर मार्गानेच व नोटीस काढूनच पार पाडावी, असे आदेश दिले आहेत.ग्रामविकास विभागाच्या या नवीन पत्रामुळे २१ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची अटकळ आता लांबणीवर पडली असून, साधारण महिन्याच्या अखेरीस किंवा नवीन वर्षात होण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येत असताना युती सरकारने पक्षांतर्गत गटबाजी व राजी-नाराजी टाळण्यासाठी विद्यमान पदाधिकाऱ्यांना १२० दिवस म्हणजे चार महिन्यांची मुदतवाढ दिली होती. सप्टेंबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात शासनाच्या या मुदतवाढीच्या आदेशाचा कागद प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या हातात पडला असला तरी, युती सरकारने २३ आॅगस्ट रोजीच हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आॅगस्ट महिन्यापासूनच चार महिन्यांचा कालावधी मोजण्यात आला. त्यानुसार येत्या दि. २० डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पदाधिकारी व विषय समित्यांचे सभापती, पंचायत समित्यांचे सभापतींची मुदत संपुष्टात येत असल्याचे पत्र राज्याच्या ग्रामविकास विभागाने मंगळवारी (दि. १०) रोजी जारी केले. सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांना अग्रेषित केलेल्या या पत्रात विद्यमान पदाधिकाºयांचा मुदतवाढीचा कालावधी दि. २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असून, त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे नमूद करण्यात आले होते. ग्रामविकास विभागाने पदाधिकाºयांची मुदत संपुष्टात येत असल्याचे कळविले असले तरी, अध्यक्ष व पदाधिकाºयांच्या निवडीसाठी राबविण्यात येणाºया कायदेशीर प्रक्रियेसाठी पुरेसा कालावधी दिला नसल्याचे सदरच्या पत्राद्वारे स्पष्ट झाल्याने प्रशासन यंत्रणेची धावपळ उडाली होती. अध्यक्ष, पदाधिकाºयांच्या निवडणुकीसाठी किमान सात दिवस अगोदर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे क्रमप्राप्त असला तरी, ग्रामविकास विभागाच्या पत्रातून तसा कोणताही उलगडा होत नसल्याचे पाहून संभ्रम निर्माण झाला होता. या संदर्भात काही अधिकाºयांनी ग्रामविकास विभागाकडे विचारणा करून त्यातील कायदेशीर अडचणी निदर्शनास आणून दिल्या.त्यानंतर मात्र रात्री उशिरा पुन्हा ग्रामविकास विभागाने नव्याने सुधारित पत्र काढून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, पदाधिकाºयांची मुदत दि. २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असली तरी, त्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार आवश्यक ती सूचना (नोटीस) निर्गमित करून निवडणुकांबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत.सुधारित पत्रामुळे दि. २१ डिसेंबर रोजीच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिकाºयांची निवडणूक होण्याची अटकळ फोल ठरली असून, सुधारित पत्राचा आधार घेऊन दि. २१ डिसेंबरनंतरच अधिसूचना प्रसिद्ध करून कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. त्यासाठी किमान सात ते नऊ दिवसांचा कालावधी लागणार असून, त्यामुळे नवीन पदाधिकाºयांची निवड डिसेंबरच्या अखेरीस अथवा नवीन वर्षात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदNashikनाशिक