शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

अवैध गर्भपात प्रकरणी शासकीय रुग्णालयांची होणार चौकशी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:22 IST

नाशिक: नाशिकमधील जिल्हा शासकीय रूग्णालयात अवैध गर्भपात करण्याचा प्रकार सन २०१७ रोजी माध्यमांनी समोर आणल्यानंतर याप्रकरणी त्यावेळी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. नाशिक जिल्'ापुरतीच सदर समिती मर्यादीत असल्याने आता राज्यातील जिल्हा शासकीय रूग्णालयांमधील अशाप्रकारच्या प्रकरणांची देखील चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसमिती गठित : नाशिकमधील घटनेनंतर आता राज्यात कार्यवाही

नाशिक: नाशिकमधील जिल्हा शासकीय रूग्णालयात अवैध गर्भपात करण्याचा प्रकार सन २०१७ रोजी माध्यमांनी समोर आणल्यानंतर याप्रकरणी त्यावेळी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. नाशिक जिल्'ापुरतीच सदर समिती मर्यादीत असल्याने आता राज्यातील जिल्हा शासकीय रूग्णालयांमधील अशाप्रकारच्या प्रकरणांची देखील चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.नाशिाक जिल्हा रूग्णालयात अवैध गर्भपात करण्यात आल्याचा प्रकार २ एप्रिल २०१७ रोजी उघडकीस आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंत्र्यांनी याप्रकरणी विधानमंडळात निवेदनही केले होते. शासकीय रूग्णालयांमध्ये घडणाऱ्या बेकायदेशीर गर्भपाताच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यात वैद्यकीय गर्भपात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते.त्यानुसार समिती देखील स्थापन करण्यात आली होती. परंतु ही समिती केवळ नाशिक जिल्'ापुरतीच मर्यादीत असल्यामुळे राज्यातील अन्य शासकीय रूग्णालयांमधील अशाप्रकारच्या प्रकरणांची चौकशी देखील होणे अपेक्षित असल्याने समितीची कक्षा रूंदवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात इतरत्र घडणाºया अवैध गर्भपात प्रकरणांची चौकशी करण्यासाठी पोलीस सेवेतील आयपीएस दर्जाच्या सेवानिवृत्त पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे.गर्भपात प्रकरणाच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी समिती आता राज्यातील शासकीय जिल्हा रूग्णालयांची देखील चौकशी करणार आहे. सेवानिवृत पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांच्या अध्यंक्षतेखील स्थापन झालेल्या या समितीमध्ये त्यांच्यासह एकुण चार सदस्य आहेत. त्यामध्ये आरोग्य सेवेतील सेवानिवृत्त संचालक, स्थीरोगतज्ज्ञ, कुटूंब कल्याण योजेनेतील सहाय्यक संचालक यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलmedicineऔषधं