सापडल्यामुळे शासकीय यंत्रणा सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 20:14 IST2020-06-29T20:12:59+5:302020-06-29T20:14:02+5:30
देवळा : देवळा तालुक्यात रविवारी दोन व्यक्ती कोरोना पॉॅझिटिव्ह आढळल्यानंतर आरोग्य, महसुल व पोलिस यंत्रणा सतर्क झाल्याअसून आतापर्यंत कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या १३ व्यक्तींचे स्वॉब नमुने घेण्यात आले असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली आहे.

खुंटेवाडी गावात ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत असलेली औषध फवारणी.
देवळा : देवळा तालुक्यात रविवारी दोन व्यक्ती कोरोना पॉॅझिटिव्ह आढळल्यानंतर आरोग्य, महसुल व पोलिस यंत्रणा सतर्क झाल्याअसून आतापर्यंत कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या १३ व्यक्तींचे स्वॉब नमुने घेण्यात आले असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली आहे.
नगरपंचायत प्रशासनाने ज्ञानेश्वर नगर, दौलत नगर व निमगल्ली भागात औषध फवारणी केली असून उर्वरीत शहरात औषध फवारणी करण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रात बॅरीकेटस लावून हा भाग सील करण्यात आला आहे. देवळा येथे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेली व्यक्ती हि देवळा नगरपंचायतीची कर्मचारी असल्यामुळे खबरदारी म्हणून नगरपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
देवळा येथील पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील हाय रिस्क असे ९ जण व खुंटेवाडी येथील पॉझिटिव्ह मुलाच्या संर्पकातील १ व्यक्ती व इतर ३ सशंयित असे एकूण १३ स्वॉब घेण्यात आले आहेत.
तालुक्यातील खर्डा, सरस्वतीवाडी व दहिवड येथील प्रत्येकी एक अशा तीन संशयित व्यक्तींना पुढील उपचारासाठी चांदवड येथील कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यांचे स्वॉबचे नमुने मंगळवारी घेण्यात येणार आहेत.
देवळा शहरातील ज्ञानेश्वर नगर व खुंटेवाडी गावात आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून प्रत्येक घरातील नागरीकांची तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
देवळा शहरातील व्यापारी असोशिएशन व सर्वपक्षियांनी तीन दिवसांसाठी जनता कर्फ्यू पुकारला आहे. यामुळे वैद्यकीय सुविधा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद आहेत.