शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

सौभाग्यवतींनो, उद्याच करा वटपूजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 1:10 AM

यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा सोमवारी (दि.१७) दुपारी २ वाजून १ मिनिटांपर्यंत आहे आणि पौर्णिमेला प्रारंभ रविवारी दुपारी २ वाजता होणार असल्याने वटपौर्णिमा कधी साजरी करावी असा संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, वटपौर्णिमा रविवारी (दि.१६) साजरी करावी असे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देरविवारी वटपौर्णिमा : पंचांगकर्त्यांनी केली स्पष्टता

नाशिक : यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा सोमवारी (दि.१७) दुपारी २ वाजून १ मिनिटांपर्यंत आहे आणि पौर्णिमेला प्रारंभ रविवारी दुपारी २ वाजता होणार असल्याने वटपौर्णिमा कधी साजरी करावी असा संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, वटपौर्णिमा रविवारी (दि.१६) साजरी करावी असे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.दाते पंचांगचे मोहनराव दाते यांनी याबाबत म्हटले आहे, यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा सोमवारी (दि.१७) दुपारी २ वाजून १ मिनिटांपर्यंत आहे. तथापि वटपौर्णिमा मात्र ज्येष्ठ शु.१४ ला म्हणजे रविवारी (दि.१६) आहे. सूर्यास्तापूर्वी ६ घटीपेक्षा अदिक व्यापिनी अशा चतुर्दशीयुक्त असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीव्रत (वटपूजन) करावे असे वचन आहे. दि. १६ जून रोजी रविवारी ज्येष्ठ शु.१४ दुपारी २ वाजून २ मिनिटांपर्यंत असून याच दिवशी पौर्णिमा तिथी सायान्हकाळी ६ घटींपेक्षा अधिक आहे. त्यामुळे १६ जून रोजीच सौभाग्यवतींनी वटपौर्णिमा साजरी करावी. वटपौर्णिमेच्या दिवशी दुपारी २ वाजून २ मिनिटांपर्यंत चतुर्दशी तिथी असली तरी त्याच दिवशी सूर्यादयापासून मध्यान्हापर्यंत म्हणजे सुमारे दुपारी १.३० वाजेपर्यंत कोणत्याही वेळी वटपूजन करावे. शास्त्रवचनानुसार ज्येष्ठ शु.१४ ला रविवारी (दि.१६) नेहमीप्रमाणे उपवासासह वटपूजन करावे. यापूर्वी शक १९३२, १९३८, १९३९ ला अशीच परिस्थिती उद्भवल्याने पंचांगकर्त्यांनी आपला निर्णय दिल्याचे मोहनराव दाते यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम