Gold chain theft continues; gold chain looted in Vrindavan Nagar | सोनसाखळी चोरीचा सिलसिला सुरुच;वृंदावननगरला सोनसाखळी ओरबाडली

सोनसाखळी चोरीचा सिलसिला सुरुच;वृंदावननगरला सोनसाखळी ओरबाडली

ठळक मुद्देनाकाबंदी असताना चोरट्याचे धाडस :पाण्डेय यांचा पंचवटीत 'दरबार'

पंचवटी : म्हसरूळ शिवारातील किशोर सूर्यवंशी मार्गावरील वृंदावननगर येथून ओंकारनगरला घराकडे पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दिड तोळे वजनाची साठ हजार रुपयांची सोनसाखळी शनिवारी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामटयांनी बळजबरीने ओरबाडून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ओंकारनगर रुक्मिणी विठ्ठल मंदीराजवळ राहणाऱ्या सुनिता भगवान तिखे या काल शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमाराला घराकडे जात असताना समोरून एका एफ झेड या स्पोर्टस‌् बाइकवरुन आलेल्या दोघा भामटयांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून नेली. संध्याकाळी पोलिसांची नाकाबंदी सुरू असतानाही सोनसाखळी चोरीची घटना घडली आणि चोर निसटून जाण्यास यशस्वी ठरले. ही घटना शनिवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी तपासणी मोहीम युध्दपातळीवर सुरु होती. तरीदेखील चोरट्यांनी धाडस करत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचे धाडस केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
---
पाण्डेय यांचा पंचवटीत 'दरबार'
म्हसरुळला सोनसाखळी चोरीची घटना घडण्याअगोरदर पंचवटी पोलीस ठाण्यात दिवसभर पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय जनता दरबारासाठी हजर होते. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून काय उपाययोजना राबविण्यात येणार आहे, याबाबत पोलिसांना सूचना केल्या. संध्याकाळी पाण्डेय हे पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच काही तासांत म्हसरुळ पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरीची घटना घडली.

Web Title: Gold chain theft continues; gold chain looted in Vrindavan Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.