खरातने बलात्कार करून आधार, पॅन कार्डही घेतले; आर्थिक गुन्हे करण्यासाठी वापरल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 07:47 IST2026-04-03T07:43:20+5:302026-04-03T07:47:11+5:30

भोंदू खरातने पीडित महिलेसह तिचे आई, वडील, भाऊ यांचे आधार व पॅन कार्ड तसेच फोटोदेखील ताब्यात घेतले होते.

Godman Ashok Kharat Suspected of Using Victims Aadhaar and PAN Cards for Financial Crimes | खरातने बलात्कार करून आधार, पॅन कार्डही घेतले; आर्थिक गुन्हे करण्यासाठी वापरल्याचा संशय

खरातने बलात्कार करून आधार, पॅन कार्डही घेतले; आर्थिक गुन्हे करण्यासाठी वापरल्याचा संशय

नाशिक : भोंदू अशोक खरातला पीडितेवर बलात्कार तसेच तिचा गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी सात दिवसांची पोलिस कोठडी मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एन. इचपुरानी यांनी सुनावली. सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुरुवारी सुनावणी पार पडली. या सुनावणीत सरकारी वकिलांनी केलेले खुलासे अत्यंत धक्कादायक होते.

भोंदू खरातने पीडित महिलेसह तिचे आई, वडील, भाऊ यांचे आधार व पॅन कार्ड तसेच फोटोदेखील ताब्यात घेतले होते. ते अद्याप परत केलेले नसल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. त्यामुळे खरातने असे अनेकांचे आधार आणि पॅन कार्ड आर्थिक गुन्हे करण्यासाठी वापरल्याचा संशय आहे. पीडितेकडून जडीबुटीचे औषध द्यायचे असल्याचे सांगून १२ हजार ५०० रुपये उकळले होते. तसेच पीडितेला तिच्या मुलांच्या भविष्याविषयी भीती घालून धार्मिक विधीच्या नावाखाली शोषण केले, असा युक्तिवाद सरकारी वकील अॅड. शैलेंद्र बागडे यांनी केला.

न्यायाधीशांसमोर जोडले हात अन् हलविली मान

सुनावणीदरम्यान आपणास काही सांगायचे आहे का? असे मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एन. इचपुरानी यांनी खरातला विचारले असता, खरात काहीएक बोलला नाही. त्याने फक्त हात जोडत नाही म्हणून मान हलवली. तिन्ही बाजूने युक्तिवाद सुरू असताना तो खुर्चीवर बसून फक्त पाहत होता.

वारंवार अत्याचार केला अन् गर्भपातही केला 

दरम्यान, फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२६ पर्यंत खरातने पीडितेवर वारंवार अत्याचार केले. त्यात पीडिता गर्भवती राहिली. नंतर तिचा गर्भपात केला. या दुसऱ्या गुन्ह्यात खरातचा ताबा एसआयटीने घेतला.
 

Web Title: Godman Ashok Kharat Suspected of Using Victims Aadhaar and PAN Cards for Financial Crimes