बिबट्याच्या हल्ल्यात बकरी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:46 IST2018-08-19T22:36:24+5:302018-08-20T00:46:35+5:30
सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे बिबट्याने बकऱ्यांच्या कळपावर हल्ला करून एका बकरीची शिकार केली. बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील संतोष रंगनाथ बर्के यांच्या वस्तीवर घराबाहेर असलेल्या बकºयांच्या दावणीवर हल्ला करून बकरीचा फडशा पाडला.

बिबट्याच्या हल्ल्यात बकरी ठार
नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे बिबट्याने बकऱ्यांच्या कळपावर हल्ला करून एका बकरीची शिकार केली. बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील संतोष रंगनाथ बर्के यांच्या वस्तीवर घराबाहेर असलेल्या बकºयांच्या दावणीवर हल्ला करून बकरीचा फडशा पाडला. रविवारी पहाटे बर्के यांच्या घरासमोर बांधलेल्या बकरीची शिकार केली.
यावेळी बकºयांचा व
पाळीव कुत्र्याºया भुंकण्याचा आवाज आल्याने बर्के कुटुंब जागे
झाले. घराबाहेर येताच बिबट्या बकºयांच्या दावणीजवळ हल्ला केलेल्या बकरीची शिकार करतानाचे दृश्य बघताच बर्के
कुटुंबाने आरडाओरडा केल्याने बिबट्याने डोंगराच्या दिशेने पळ काढला.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवारात बिबट्याचा संचार वाढल्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच रविवारी घरासमोर बांधलेल्या बकरीची शिकार केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.