शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जयघोष : पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, निवृत्तिनाथ महाराज की जय...

By admin | Updated: January 10, 2015 00:26 IST

दिंड्यांचे त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान

जायखेडा : गेल्या ६० वर्षांची अखंड परंपरा असलेली जायखेडा ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी टाळमृदंगाच्या गजरात व ‘पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री निवृत्तिनाथ महाराज की जय’च्या नामघोषात येथून रवाना झाली.खान्देशातील छोट्या-मोठ्या शेकडो दिंड्या जायखेडा येथे दाखल झाल्यानंतर वैकुंठवासी कृष्णाजी माउली जायखेडकर यांच्या निवासस्थानापासून या दिंडीचे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान झाले. पदयात्रेत सहभागी हजारो वारकरी बांधवांनी कृष्णाजी माउलींच्या समाधिस्थळी जाऊन दर्शन घेतले. कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी हजारो वारकरी पदयात्रेद्वारे हरिनामाचा जयघोष करीत त्र्यंबककडे रवाना झाले. कपाळी केशरी गंध, डोक्यावर टोपी, अंगात अंगरखा, कमरेला धोतर, खांद्यावर भगवी पताका व मुखात नामस्मरण असलेले वारकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.पदयात्रा मार्गावरील विविध गावांमध्ये पदयात्रेत सहभागी वारकऱ्यांचे स्वागत करण्यात येते. गावोगावी मुक्काम करीत भजन, कीर्तन, भारुड, प्रवचनांद्वारे समाजप्रबोधन करीत दिंडी निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होणार आहे. १९५७ साली गुरुवर्य कृष्णाजी माउली जायखेडकर यांनी अवघ्या पाच व्यक्तींना सोबत घेऊन या दिंडीस सुरुवात केली. बघता बघता या छोट्याशा रोपट्याचे आता विशाल अशा वटवृक्षात रूपांतर झाले आहे. धुळे, नंदुरबार, जळगावसह नाशिक जिल्ह्यातील हजारो वारकरी भाविक या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होत आहेत. सर्वात मोठी व शिस्तबद्ध दिंडी म्हणून या दिंडीचा नावलौकिक आहे.जायखेडा येथून निघालेल्या दिंडी सोहळ्यात महिला वारकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. वर्षानुवर्षे अखंडपणे सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. दिंडी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी वेश, टाळ, पताका व हरिपाठ येणे आवश्यक आहे. तसेच व्यक्ती व्यसनमुक्त असणे गरजेचे आहे. तंबाखू किंवा तत्सम धूम्रपान करणाऱ्यास दंड असल्याने व्यसनमुक्तीचे मोठे कार्य या माध्यमातून होत आहे.निताणे, करंजाड, केरसाने, कपालेश्वर, कंधाणा, विसापूर, बेज, कळवण, ओतूर, मुळाणे, बाबापूर, आंबेवणी, तळेगाव, पिंपळणारे, म्हसरूळ, पंचवटी, नाशिक, पिंपळगाव बहुला, धडगाव, गणेशगाव, बंबईवाडी असा प्रचार करीत ही पदयात्रा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधिस्थळी नतमस्तक होणार आहे. वै. स्वानंद सुखनिवासी कृष्णाजी माउली पादुका ठेवलेला भव्य रथ या पदयात्रेत सामील करण्यात आला आहे. माउलींच्या पादुका दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. (वार्ताहर)