शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
4
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
5
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
6
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
7
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
8
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
9
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
10
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
11
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
12
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
13
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
14
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
15
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
16
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
17
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
18
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
19
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
20
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या

By admin | Updated: April 4, 2017 00:33 IST

चांदवड : चांदवड तालुका राष्ट्रीय कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

 चांदवड : चांदवड तालुका राष्ट्रीय कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्या वतीने चांदवड तहसीलदार कार्यालयासमोर सोमवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण माजी आमदार शिरीष कोतवाल व उत्तम भालेराव, तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, तालुकाध्यक्ष संजय जाधव, उपसभापती अमोल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी आमदार निर्मला गावित यांनी प्रांताधिकारी भीमराज दराडे व तहसीदार डॉ. शरद मंडलिक यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, चांदवड तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असून, चांदवड तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात नेहमीच गारपीट, दुष्काळ या नैसर्गिक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे उत्पादन घेण्यात आले आहे. परंतु शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या पिकाचे मोल बाजारपेठेत होत नाही. शेतकऱ्यास नाइलाजास्तव उत्पादन खर्चापेक्षा कमी भावाने शेतमाल विक्र ी करावा लागत आहे. शेतमाल नाशवंत असल्याने जास्त दिवस साठवून ठेवता येत नाही. काढणीनंतर लगेच विक्र ी करावा लागतो. शेतकरीवर्गास आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी व त्याच्या कष्टास न्याय देण्यासाठी १०० टक्के कर्जमाफी देण्याबाबत शासनाने योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.यावेळी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल व उत्तमबाबा भालेराव, राष्ट्रीय कॉँग्रेसचे येथील अध्यक्ष संजय जाधव, कार्याध्यक्ष समाधान जामदार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, खंडेराव अहेर, नवनाथ अहेर, उपसभापती अमोल भालेराव, तुकाराम सोनवणे, रिजवान घासी, शिवाजी यमाजी अहेर, प्रकाश शेळके, दीपांशू जाधव, उत्तमराव ठोंबरे, बाळासाहेब माळी, कांतीलाल बाफना, नगरसेवक अल्ताफ तांबोळी, खरेदी-विक्री संघाचे सभापती गणेश ठाकरे, खंडू सोमवंशी, औचित खेतरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)