अंगणवाडी सेविकांना मनपा सानुग्रह देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:30 IST2018-10-31T00:30:22+5:302018-10-31T00:30:43+5:30
महापालिकेच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांवर प्रशासनाची वक्रदृष्टी असली तरी आयुक्तांनी आता सेविका आणि मदतनीसांना अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या १७२ अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे काम थांबविण्यात आले आहे.

अंगणवाडी सेविकांना मनपा सानुग्रह देणार
नाशिक : महापालिकेच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांवर प्रशासनाची वक्रदृष्टी असली तरी आयुक्तांनी आता सेविका आणि मदतनीसांना अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या १७२ अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे काम थांबविण्यात आले आहे. त्यांच्या संदर्भात सुधारित आदेश काढण्यात आल्याने आता या कर्मचाºयांची दिवाळी गोड होणार आहे. महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी (दि.३०) यासंदर्भात आदेश काढले व मागील वर्षी दीपावली सणानंतर मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना अन्य कर्मचाºयांप्रमाणेच १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीच्या आदेशात ही सुधारणा नसल्याने २७२ चालू अंगणवाड्यांच्या कर्मचाºयांनाच त्याचा लाभ होणार होता आणि प्रशासनाने बंद केलेल्या १३६ अंगणवाड्यांचे कर्मचारी वंचित राहणार होते, मात्र यासंदर्भात महापौर रंजना भानसी व सभागृह नेता दिनकर पाटील यांनी प्रशासनाला पत्र दिले होते. तसेच अंगणवाड्यांसाठी लढणाºया भारतीय हितरक्षक सभेच्या माध्यमातूनदेखील वर्षातून ३० दिवस काम करणाºयांना सानुग्रह अनुदान द्यावे लागते हा कायदा प्रशासनाकडे मांडण्यात आला होता. अखेरीस महापालिकेने तसा निर्णय घेतल्याने या कर्मचाºयांची दिवाळी गोड झाली आहे.