शाळेच्या बहाण्याने गेलेल्या मुलींचा अवघ्या चोवीस तासात शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 23:01 IST2018-12-05T22:59:23+5:302018-12-05T23:01:04+5:30

नाशिक : शाळेच्या बहाण्याने घरातुन गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा अंबड पोलीसांनी अवघ्या चोवीस तासात शोध लावल असून त्यांना सोलापुर येथुन ताब्यात घेतले़ आपल्या मुली सुखरुप असून त्या पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित असल्याचे कळल्यानंतर या पालकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले.

The girls went out of school and searched for only 24 hours | शाळेच्या बहाण्याने गेलेल्या मुलींचा अवघ्या चोवीस तासात शोध

शाळेच्या बहाण्याने गेलेल्या मुलींचा अवघ्या चोवीस तासात शोध

नाशिक : शाळेच्या बहाण्याने घरातुन गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा अंबड पोलीसांनी अवघ्या चोवीस तासात शोध लावल असून त्यांना सोलापुर येथुन ताब्यात घेतले़ आपल्या मुली सुखरुप असून त्या पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित असल्याचे कळल्यानंतर या पालकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले.

अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटीलनगर, उंटवाडी, मटाले मळा या परिसरातील तीन मैत्रिणी मंगळवारी (दि़४) दुपारी शाळेत जाण्याच्या बहाण्याने घरातुन बाहेर पडल्या होत्या़ आठवीच्या इयत्तेत शिकणा-या या मुली सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने पालकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र त्या न सापडल्याने अंबड पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार केली़

पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवीली. यानंतर या तीनही शाळकरी मुलींना सोलापुर रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलीसांनी ताब्यात घेतले. या मुली घरातुन निघुन नाशिकरोड रेल्वेस्टेशन येथे पोहोचल्या व तेथून दौंडमार्गे सोलापुरात पोहोचल्या. यापैकी एका मुलीने घरातुन एक हजार चारशे रुपये व आईची सोन्याची पोथ चोरून नेली होती.

दरम्यान, या मुलींना ताब्यात घेण्यासाठी अंबड पोलीसांचे एक पथक सोलापुर कडे रवाना झाले आहे.

Web Title: The girls went out of school and searched for only 24 hours