मैत्रिणीच्या आईनेच केले अल्पवयीन मुलीचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 17:15 IST2018-09-18T17:15:20+5:302018-09-18T17:15:46+5:30
पंचवटी : नांदूरनाका परिसरात राहणाऱ्या मुलीच्या बारा वर्षीय मैत्रिणीचे अपहरण करून तिला आमिश दाखवून दिल्ली येथे एका इसमाशी जबरदस्तीने विवाह लावून दिला. त्यानंतर संशयित आरोपी व त्याच्या भावाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन सहा वर्ष बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर पीडित युवती नाशिकला परतल्यानंतर तिने झाला प्रकार नातेवाईकांना सांगितला त्यानंतर आडगाव पोलीसात तब्बल ८ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प विहितगाव येथे राहणाºया संशयित संगीता होंडे या महिलेला अटक केली आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती नांदूर नाक्यावर असलेल्या घरी २०१२ मध्ये तिची मैत्रीण गौरी हिची आई संशयित आरोपी नंदा हिने जेवणात गुंगीचे औषध खाऊ घातले. गुंगी आल्यावर रिक्षात टाकून संशयित मंगला हिच्याकडे सोडून दिले. मंगलाने महिनाभर खोलीत कोंडून नंतर मुलगी पूजाकडे पाठविले. तेथून संशयित संगीता, राजू व संजय यांच्यासोबत दिल्ली व उत्तर प्रदेशातील रतोडा गावात नेले तेथे संजय बरोबर जबरदस्तीने लग्न लावून दिले त्यानंतर संजय याने पीडितेला मारहाण करून सन २०१२ पासून या ६ वर्षांच्या कालावधीत बळजबरीने बलात्कार केला. संजय त्याचा भाऊ विनोद यांनी पीडितेशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले.
काही दिवसांपूर्वी पीडिता हिने लग्न लावून दिलेल्या इसमाला मला माझ्या आईकडे नाशिकला जायचे असे सांगितले, त्यावर सदर इसमाने तीला नांदूरनाका येथे आणून सोडले व तो निघून गेला सदर पीडितेला दोन अपत्य आहे. दरम्यान पीडित मुलगी बेपत्ता झाल्या प्रकरणी काही वर्षांपूर्वी आडगाव पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आलेली होती. पीडितेने दिलेल्या तक्र ारीनुसार संशयित नंदा, मंगला, पूजा, संगीता, रंजना, राजू, संजय व विनोद अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.