ढेकूजवळ अपघातात तरुणी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:04 IST2019-06-18T23:49:17+5:302019-06-19T01:04:34+5:30
ढेकू येथील शिंदे वस्तीजवळ मंगळवारी (दि. १८) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जातेगावच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात दुचाकी चालकाने धडक दिल्याने शुभांगी एकनाथ शिंदे ही मुलगी जखमी झाली.

ढेकूजवळ अपघातात तरुणी जखमी
नांदगाव : तालुक्यातील ढेकू येथील शिंदे वस्तीजवळ मंगळवारी (दि. १८) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जातेगावच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात दुचाकी चालकाने धडक दिल्याने शुभांगी एकनाथ शिंदे ही मुलगी जखमी झाली. शुभांगीच्या डोक्याला मोठी कोच पडली असून, उजव्या पायाच्या पंजाजवळ फॅक्चर झाले आहे. जातेगाव येथे उपचार करून पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथे नेण्यात आले आहे.
लहान बहीण दुर्गाला (६) बोलठाण येथील इंग्लिश मीडिअम स्कूलच्या बसमध्ये बसवून
रस्त्याच्या बाजूला शुभांगी उभी असताना हा अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शी भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी सांगितले.
शिंदे वस्ती येथील निवासी आश्रमशाळेजवळ वारंवार लहान-मोठे अपघात होत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी सरपंच ज्योती सूर्यवंशी यांनी केली आहे.