शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरूचा गिरीशचंद्र ‘मॅरेथॉन चॅम्पियन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2016 00:25 IST

४२ किलोमीटरची स्पर्धा : राष्ट्र बळकटीसाठी धावले ३५०० स्पर्धक; ज्येष्ठांमध्ये कोल्हापूरचे बाळासाहेब विजयी

नाशिक : ‘आरोग्यासाठी धाव घ्या व देशाला बलवान करा’ या उदात्त हेतूने मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय व आठव्या राज्यस्तरीय ‘नाशिक मॅरेथॉन’ स्पर्धेत विविध गटांमध्ये सहभागी ३५०० स्पर्धकांनी धाव घेतली. यावेळी पुरुष गटात ४२.१९५ किलोमीटर इतके अंतर अवघ्या अडीच तासांत कापणारा बंगळुरूचा गिरीशचंद्र तिवारी हा ‘मविप्र मॅरेथॉन चॅम्पियन’ ठरला, तर उत्तराखंडचा कमल दर्शन सिंग याने दुसरा क्रमांक पटकाविला.राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेता आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू नरसिंह यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत गंगापूररोडवरील मविप्र मॅरेथॉन चौकामधून सकाळी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, पोलीस आयुक्त एस.जगनाथन, क्रीडाअधिकारी संजय सबनीस, अ‍ॅड. नितीन ठाकरे, नाना दळवी, डॉ. सुनील ढिकले, भाऊसाहेब खताळे आदि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, जोरदार आतषबाजीसह ढोल-ताशांच्या गजरात मान्यवरांनी हवेत रंगीबेरंगी फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन केले. समाजात आरोग्याविषयी जागृती व्हावी व खेळाडूंकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकाधिक सकारात्मक व्हावा यासाठी गेल्या सोळा वर्षांपासून मविप्रकडून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. नववर्षाच्या पहिल्या रविवारी पार पडलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रसह, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली या राज्यांमध्यून विविध वयोगटांमध्ये स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. अर्थ मॅरेथॉन खुल्या पुरुष गटात व अर्ध मॅरेथॉन खुल्या महिला गटांमध्ये एकूण ३०० स्पर्धक सहभागी झाले होते. तसेच वरिष्ठ-कनिष्ठ महाविद्यालय मुला-मुलींचा गट, माध्यमिक शालेय गट, प्राथमिक शालेय मुला-मुलींचा गट, महिला-पुरुष ज्येष्ठ नागरिक अशा एकूण सोळा गटांमध्ये तीन हजार पाचशे स्पर्धकांचा समावेश होता.राष्ट्रीय पातळीवरील मॅरेथॉन स्पर्धेचे सातत्यपूर्ण आयोजन करत ‘मविप्र’ने शतकमहोत्सवी वर्षात एक वेगळा आदर्श उपक्रम राबविला आहे. राष्ट्रीय विकासासाठी खेळाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात असून, स्पर्धेमध्ये भाग घेऊन आरोग्य उत्तम ठेवून देशाचे नाव उज्ज्वल करण्याची संधी असल्याचे कुस्तीपटू नरसिंह यादव याने यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)