शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर दिले
3
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
4
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
5
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
7
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
8
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
9
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
10
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
11
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
12
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
13
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
14
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
15
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
16
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
17
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
18
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
19
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
20
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

दंड कारवाईत सवलत मिळवा

By admin | Updated: October 11, 2016 01:17 IST

महापालिकेची योजना : वाणिज्य वापरकर्त्यांसाठी संधी

नाशिक : रहिवासी मिळकतींचा वाणिज्य-व्यावसायिक पातळीवर वापर करत महापालिकेचा कर बुडविणाऱ्या मिळकतधारकांसाठी मनपा प्रशासनाने सवलत योजना जाहीर केली असून, येत्या १० नोव्हेंबर २०१६ पर्यंत स्वत:हून आपली चूक कबूल करणाऱ्या मिळकतधारकांबाबत दंड व कारवाईविषयी सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, आगामी काळात होणाऱ्या मालमत्ता सर्वेक्षणात वापरातील बदल आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिला आहे.
महापालिकेच्या घरपट्टी विभागाने दोन महिन्यांपूर्वी पश्चिम विभागात नमुना सर्व्हे करत रहिवासी मिळकतींचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांचा शोध घेतला असता त्यात ४८ मिळकतधारक आढळून आले होते. त्यानंतर सर्व विभागीय कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या सर्वेक्षणात १३०९ मिळकतधारकांनी वापरात बदल करत मनपाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले होते. महापालिकेने संबंधितांना कारवाईबाबत नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, वापरात बदल करत कर बुडवणाऱ्यांची संख्या याहून अधिक असल्याचा संशय मनपा प्रशासनाला आहे. त्यामुळे महापालिकेने दि. १० आॅक्टोबर ते १० नोव्हेंबर २०१६ कालावधीत ज्या मिळकतधारकांनी वापरातील बदल स्वत:हून कळवित आपली चूक मान्य केल्यास त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई न करता सकारात्मक निर्णय घेण्याविषयी योजना आणली आहे.