शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी २९ जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:35 IST

दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेचा भाग-२ भरण्यासाठी ११ जूनपासून सुरुवात झाली असून, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ व भाग २ भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी २९ जूनला जाहीर करण्यात येणार आहे.

नाशिक : दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेचा भाग-२ भरण्यासाठी ११ जूनपासून सुरुवात झाली असून, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ व भाग २ भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी २९ जूनला जाहीर करण्यात येणार आहे.  अकरावीची प्रवेशप्रक्रिया वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये राबविण्यात येणार असून, या प्रक्रियेत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्जाचा भाग-१ व भाग-२ भरणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही प्रक्रि या पूर्ण केल्या नाहीत त्यांना पुढील प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ भरून त्याची पडताळणी झाल्यानंतर भाग-२ भरावा लागणार आहे. भाग-२ साठी कोणतीही पडताळणी करावी लागणार नाही.या प्रवेशप्रक्रियेत १३ ते २९ जून या कालावधीत बायोफोकल, इनहाउस व अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश करण्यात येणार आहे. दरम्यान, १३ ते १८ जून (६ दिवस) द्विलक्षी बायोफोकल विषयांचे पसंतीक्रम भरणे व कोटा प्रवेशांतर्गत इनहाउस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी महाविद्यालय स्तरावर विविध विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारणे, कोटा प्रवेशाची गुणवत्ता यादी महाविद्यालय स्तरावरून जाहीर करणे व झालेले कोटा प्रवेश महाविद्यालयाकडून केंद्रीय प्रवेश प्रणाली अद्ययावत करणे ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, २९ जूनपर्यंत बायोफोकल प्रवेशप्रक्रियाही पूर्ण होणार असून, याच दिवशी नियमित अकरावी प्रवेशासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार  आहे.  दरम्यान, बायोफोकोलच्या २५ टक्के राखीव जागांसाठी आतापर्यंत प्रवेश जाहीर झाले असून, दुसºया फेरीत शुक्रवारपर्यंत (दि. २९) प्रवेश घेता येणार आहे. २३ हजार विद्यार्थ्यांनी भरले दोन्ही भागअकरावी प्रवेशासाठी नाशिक शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये सुमारे २७ हजार ९०० उपलब्ध जागांसाठी २७ हजार ५८३ आॅनलाइन अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी २३ हजार १८५ विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रियेचा भाग दोन भरून अर्ज सबमिट केला आहे. यात २७३ विद्यार्थ्यांनी बायोफोकलच्या २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी उपलब्ध पर्याय निवडला असून, २२ हजार ९८७ विद्यार्थ्यांनी विविध शाखा व महाविद्यालयांसाठी पसंतीक्रम नोंदवून त्यांचे आॅनलाइन अर्ज सादर केले आहेत.

टॅग्स :collegeमहाविद्यालय