गायत्री गंधारे यांची प्रकृती स्थिर; सुरेखा शिंदे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 14:11 IST2021-09-08T14:11:18+5:302021-09-08T14:11:53+5:30
अपघातात दुचाकीस्वार सुरेखा व गायत्री या दोघी गंभीर जखमी झाल्या. सुरेखा यांचा जागीच मृत्यू झाला, तर गायत्री यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

गायत्री गंधारे यांची प्रकृती स्थिर; सुरेखा शिंदे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यु
नाशिक : जयभवानी रोडवरील फर्नांडिसवाडी येथे दोन दिवसांपूर्वी एका भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत बेलतगव्हाण येथील दोन्ही मैत्रिणी गंभीर जखमी झाल्या होत्या. बेलतगव्हाण माउलीनगर येथील रहिवासी असलेल्या सुरेखा दिलीप शिंदे (३८) यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला तसेच त्यांची मैत्रीण गायत्री रवी गंधारे यांनाही जबर मार लागल्याने देवळाली सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकिय सुत्रांनी दिली आहे.
गायत्री रवी अंधारे आणि सुरेखा शिंदे या दोघी मैत्रिणी रविवारी (दि.५) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ॲक्टिव्हा दुचाकीने (एमएच १५ जीसी ५६३६) जय भवानीरोड फर्नांडिसवाडी येथून घरी बेलतगव्हाणकडे जात होत्या. यावेळी भरधाव आलेल्या फोर्ड फिगो कारच्या (एमएच०२ सीबी९३२१) चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार सुरेखा व गायत्री या दोघी गंभीर जखमी झाल्या. सुरेखा यांचा जागीच मृत्यू झाला, तर गायत्री यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. त्यांनाही अपघातात जबर मार लागला. दरम्यान, उपनगर पोलिसांनी कार चालक आकाश श्रीवास्तव (रा. सदगुरूनगर, जयभवानी रोड) याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.