गौतमनगर रहिवाशांचा महापालिकेवर मोर्चा

By Admin | Updated: October 27, 2016 00:48 IST2016-10-27T00:47:54+5:302016-10-27T00:48:29+5:30

निदर्शने : विविध मागण्यांचे निवेदन

Gautamnagar Residents Municipal Front | गौतमनगर रहिवाशांचा महापालिकेवर मोर्चा

गौतमनगर रहिवाशांचा महापालिकेवर मोर्चा

नाशिक : गौतमनगर, शांतीनगर, रमाबाई आंबेडकरनगर व साठेनगर येथील विविध समस्यांबाबत रहिवाशांनी महापालिकेवर निषेध मोर्चा काढत निदर्शने केली. यावेळी अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आले.  मार्शल ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत खरात, दीपक डोके, अनिल आठवले यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी महापालिकेवर मोर्चा नेला. गौतमनगर, शांतीनगर, रमाबाई आंबेडकरनगर, साठेनगर या वसाहतींना स्लम घोषित करून घरपट्टी लागू करावी, पिण्याच्या पाण्यासाठी पाइपलाइन टाकावी, घरकुले बांधून मिळावीत, भुयारी गटार योजना राबवावी तसेच परिसरात डास प्रतिबंधक धूर व औषध फवारणी करावी, अशा मागण्या रहिवाशांनी निवेदनाद्वारे केल्या.   दरम्यान, संबंधित रहिवाशांना घरकुल योजनेअंतर्गत चुंचाळे येथे लाभ देण्याचे निश्चित झाले आहे. त्यातील ३५० रहिवाशांनी संमतीही दर्शविली आहे, परंतु काही लोकांचा विरोध असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
(प्रतिनिधी)


 

Web Title: Gautamnagar Residents Municipal Front