नाशिक : प्यारा परिवार संस्थेतर्फे आयोजित वधू-वर मेळाव्यात देशभरातील सिंधी समाजाच्या विवाहेच्छुक वधू-वरांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात एकवीस ते तीस वर्ष वयातील उमेदवार तसेच किमान पदवी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचा समावेश होता.उद्घाटनप्रसंगी डॉ. विजय महाराज सेतपाल यांच्यासह सुराज महाराज सेतपाल, अॅड. प्रकाश आहुजा, श्याम मोटवाणी, शंकर जयसिंघानी, प्रकाश कटपाल, सुनील केसवानी, सतीश पंजवाणी, प्रकाश मनवाणी, दीपक तोलानी, हेमंत भोजवानी, महेश नागपाल आदी उपस्थित होते. महिला प्रतिनिधींपैकी देवीदीदी लक्ष्मीयाणी, प्रिया साधवानी, अॅड. ज्योती आहुजा यांनी सहभाग घेतला. डॉ. विजय महाराज सेतपाल म्हणाले, की समाजातर्फे प्रथमच सूक्ष्म नियोजनावर आधारित मेळावा आयोजित केला आहे. या माध्यमातून विवाह जुळण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिले आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रारंभी सहभागी उमेदवारांची ओळख करून दिली.
सिंधी समाजाचा वधू-वर मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:53 IST