सिन्नर- घोटी महामार्गावर गॅस टँकर पेटला; वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 13:09 IST2018-08-06T13:09:05+5:302018-08-06T13:09:44+5:30
सिन्नर: सिन्नर- घोटी महामार्गावर पेट्रोल पंपाजवळ वळणावर गॅस टँकर उलटून टँकरने पेट घेतल्याची घटना दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली.

सिन्नर- घोटी महामार्गावर गॅस टँकर पेटला; वाहतूक बंद
सिन्नर: सिन्नर- घोटी महामार्गावर पेट्रोल पंपाजवळ वळणावर गॅस टँकर उलटून टँकरने पेट घेतल्याची घटना दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलीस व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. टँकरने पेट घेतल्याने आगेचे मोठे लोळ दिसत आहेत. त्यात दोन दुचाकी जळल्याचे समजले. या आगीत अन्य वाहने पेटल्याची भीती व्यक्त केली जात आहे. खबरदारी म्हणून महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सिन्नर- घोटी महामार्गावर वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे खबरदारी म्हणून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्हीबाजूकडील वाहतुक ठप्प झाली आहे. परिसरातील बघ्यांनी गर्दी केली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरू आहे.