शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

घरगुती सिलिंडरमधून गॅसची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:39 IST

ग्राहकांना घरगुती गॅस सिलिंडर पोहोच करणाऱ्या चंद्रकांत गॅस एजन्सी या भारत गॅस वितरकाकडे नोकरीस असलेल्या दोघा कामगारांना मखमलाबाद शिवारात गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले.

पंचवटी : ग्राहकांना घरगुती गॅस सिलिंडर पोहोच करणाऱ्या चंद्रकांत गॅस एजन्सी या भारत गॅस वितरकाकडे नोकरीस असलेल्या दोघा कामगारांना मखमलाबाद शिवारात गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. गॅस सिलिंडरमधून गॅसची चोरी करताना पोलिसांना ते आढळून आले. त्यांच्याकडून एकूण तीस सिलिंडरसह रिक्षा जप्त करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गॅस सिलिंडर वितरकाकडे काम करणारे डिलिव्हरीबॉय ग्राहकांना सिलिंडर घरपोहोच करण्यापूर्वी त्यामधून गॅस चोरी करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक बलराम पालकर, प्रवीण कोकाटे, संजय मुळक, शांताराम महाले, विशाल देवरे, चव्हाण आदींनी मखमलाबाद शिवारातील विद्यानगरजवळ सापळा रचला. यावेळी ओमनगर परिसरात रस्त्याच्या कडेला एक रिक्षा (एमएच १५, एजी ९८४६) संशयास्पदरीत्या उभी करण्यात आल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी रिक्षाजवळ धाव घेत पाहणी केली असता संशयित आरोपी प्रभू प्रकाश अवसारमोल (रा. वाघाडी), अनिल केशव घोडे (रा. गंजमाळ, भीमवाडी) हे दोघे कामगार एजन्सीमधून घेऊन निघालेल्या भरलेल्या गॅस सिलिंडरमधून यंत्राच्या सहाय्याने गॅसची चोरी करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-१ करीत आहे.घरगुती वापराचे दोन रिकामे सिलिंडरसह भरलेले २६ आणि १ व्यावसायिक वापराचे मिळून ३० सिलिंडरसह वाहन जप्त करण्यात आले आहे. भरलेल्या सिलिंडरमधून रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅसचा भरणा करत चोरी केल्याचीकबुली संशयितांनी पोलिसांकडे दिली आहे.

टॅग्स :theftचोरीNashikनाशिकPoliceपोलिस