शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

वाजतगाजत गणपती आले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 01:42 IST

कुठे ढोल, कुठे हलगीचा नाद, कुठे लेजीम पथकाची मिरवणूक तर कुठे बालगोपाळांच्या पथकाच्या तडतड ताशाच्या स्वरात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले.

नाशिक : कुठे ढोल, कुठे हलगीचा नाद, कुठे लेजीम पथकाची मिरवणूक तर कुठे बालगोपाळांच्या पथकाच्या तडतड ताशाच्या स्वरात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले. भाविकांनी पारंपरिक वेश परिधान करीत घरोघरी सकाळच्या वेळेत तर सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.गणरायाचे घरोघरी साधेपणाने व पारंपरिक पद्धतीने आगमन झाले. पर्यावरण जागृतीमुळे भाविकांकडून यंदा इको फ्रेन्डली अर्थात शाडूमातीच्या मूर्तींना नागरिकांनी प्राधान्य दिले होते. अनेक नागरिकांनी गुरुजींकडून विधिवत पूजा करून घेत तर बहुतांश घरांमध्ये गणेश आरती आणि गणपती अथर्वशीर्ष पठणाद्वारे गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.सोमवारी सकाळपासूनच घरोघरी ‘गणपती बाप्पा मोरया, एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार’ असे जयघोष घुमू लागले. रविवार कारंजावरील सिद्धिविनायक, भद्रकालीतील साक्षी गणेश, गुलालवाडी मित्रमंडळाचा गणपती अशा सर्व मानाच्या गणपतींची पारंपरिक जल्लोषात प्रतिष्ठापना केली. नाशिकरोड, सिडको, सातपूर, पंचवटी येथेही गणेशोत्सवाचा जल्लोष करीत गणरायाची स्थापना करण्यात आली.आरास सजावटीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू व साहित्यांचे स्टॉल बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लागले होते. यामध्ये पूजेसाठी लागणारे हार, फुले, दुर्वा, कापूर, केळी, कापूस, वस्त्र, नारळ, केवडा, कमळ, तोरण, मोरपीस अशा विविध साहित्यांची बाजारात रेलचेल होती. पूजेला लागणाºया फुलांबरोबरच फळांचीही मोठ्या प्रमाणावर विक्र ी झाली. पूजेला लागणाºया पाच फळांचे दर ४० ते ५० रु पये होते, तर पत्री १० ते २० रुपयांना होती. त्याशिवाय सोळा भाज्या एकत्र करून केलेली मिश्र भाजीदेखील ३० ते ४० रुपये दराने बाजारात मिळत होती. थर्माकोलला बंदी असल्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर प्लायवूड, पुठ्ठा, वेलवेट, एलईडी, लेस अशा आकर्षक सजावटीचे सिंहासन, बैठका, मंदिर-मखरे बाजारात दिसून येत होती. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने महानगरातील लहान, मोठ्या ढोल, ताशा पथकांनी तासाच्या हिशेबाने तर कुणी केवळ काही अंतराच्या हिशेबाने चांगली कमाई करून घेतली.वाहतूक सुरळीत; द्वारकाला कोंडीदरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्य रस्त्यांसह बाजारपेठांमध्ये आणि गोल्फ क्लबवरील गणेशमूर्ती स्टॉलवरदेखील गर्दीचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी होते. त्यामुळे यंदा वाहतुकीची कोंडी किंवा वाहतूक कोलमडून पडण्याचे प्रकार फारसे घडले नाहीत. मात्र नाशिक-पुणेरोडवरील द्वारकाजवळ असलेल्या गणेश मूर्ती स्टॉलसवर मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती.नाशिकरोड परिसरात सकाळपासून गणेशोत्सवाचा उत्साह दिसून आला. बिटको चौकातील स्टॉल्सवर मूर्ती घेण्यासाठी सार्वजनिक मंडळे तसेच कुटुंबीयांनी गर्दी केली होती. काही मंडळांनी ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत गणरायाचा जयजयकार करत मिरवणूक काढून श्री गणरायाची स्थापना केली.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवNashikनाशिक