शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

गंगापुररोडवासीयांचा उडाला थरकाप : साडेतीन तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 4:07 PM

गंगापूर रोडवरील नरसिंहनगरचा परिसर हा दाट लोकवस्तीचा आहे. येथील मोकळ्या भूखंडांवरील झाडीझुडपांमध्ये बिबट्याने आश्रय घेतला होता. दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण झाले.

ठळक मुद्देवनविभागाचे शर्थीचे प्रयत्न यशस्वी

नाशिक : शहरातील उच्चभ्रू लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळख असलेल्या गंगापूर रोडवरील नरसिंहनगर भागात बिबट्याने रविवारी (दि.१८) सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास एन्ट्री केली अन‌् रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सुमारे साडेतीन तास चाललेल्या थरारानंतर बिबट्याला बेशुद्ध करण्याकरिता वनविभागाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आणि रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.गंगापूर रोडवरील नरसिंहनगरचा परिसर हा दाट लोकवस्तीचा आहे. येथील मोकळ्या भूखंडांवरील झाडीझुडपांमध्ये बिबट्याने आश्रय घेतला होता. घटनेची माहिती वनविभागाला समजताच, नाशिक पश्चिम वनविभागाचे रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. बिबट्याचा माग काढण्यास पथकाला यश आले. येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्येही बिबट्या धावताना दिसत असल्याचा भक्कम पुरावा वनखात्याच्या हाती लागला. यामुळे पथकाला याच भागात तळ ठोकून शोधमोहीम सुरू केली. वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी या बचाव मोहिमेचा मोर्चा सांभाळलला. पत्र्याच्या शेडमध्ये झाडीत बिबट्या दडून बसल्याची खात्री पटली. येथे काही मिनिटे विश्रांती घेतल्यानंतर रहिवाशांचा कल्लोळ सुरू होताच, बिबट्याने तेथून मागील बाजूस असलेल्या कुंपनावरून थेट अक्षरधाम सोसायटीच्या पार्किंगमध्ये उडी घेतली. बिबट्या एका जागी स्थिर राहत नसल्याने, त्यास बेशुद्ध करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. चाणक्य इमारतीत उडी घेत, जिन्याखालील मोकळ्या जागेत जाऊन बिबट्या दडून बसला असता, पशुवैद्यकीय अधिकारी वैशाली थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचाऱ्यांनी त्यास अचूकरीत्या 'डार्ट' मारला. काही मिनिटांतच बिबट्या बेशुद्ध होताच, त्याला मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले वनरक्षक, वनमजुरांनी स्ट्रेचरवरून रेस्क्यू वाहनातील पिंजऱ्यात टाकले. दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण झाले.-वनक्षेत्रपाल भदाणे किरकोळ जखमीबिबट्याला रेस्क्यू करत असताना, ट्रॅन्क्युलाइज गनद्वारे त्यास डार्ट मारण्याच्या तयारीत असलेल्या वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्यावर अक्षरधाम इमारतीच्या पार्किंगमध्ये बिबट्याने चाल केली. या हल्ल्यात ते सुदैवाने बचावले. बिबट्याने त्यांच्या पायाच्या पोटरीला पंजा मारल्याने ते किरकोळ स्वरूपात जखमी झाले.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागleopardबिबट्याwildlifeवन्यजीव