दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 19:08 IST2020-07-15T19:06:57+5:302020-07-15T19:08:39+5:30

धारधार कोयता, मिरचीची पूड, नायलॉन दोरी यासह दरोड्यासाठी लागणारे आदी साहित्य आढळून आले.

A gang preparing for a robbery is in custody | दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी ताब्यात

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी ताब्यात

ठळक मुद्देसात संशयितांना बेड्या भारतनगरच्या मैदानावर घेतला होता आश्रय

नाशिक : दरोड्याची तयारी करत भारतनगर येथील एका मोकळ्या मैदानावर रात्रीच्यावेळी एकत्र बसून सात संशयित गुन्हा घडविण्याबाबतची आखणी करत असल्याची कुणकुण मुंबईनाका पोलिसांना लागली. पथकाने शिताफिने या टोळीच्या मुसक्या बांधल्या.
याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी (दि.१४) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास भारतनगर येथील एका मोकळ्या भुखंडावर संशयित समीर मुन्ना शहा (२३), वसीम अब्दुल शेख (२३), दीपक पिंताबर गायकवाड (३७), फकीरा रमेश बडे (३१), रवी भांगरे उर्फ बाली, राहुल, किरण खंबाईत उर्फ हुक्का अशा सात संशयितांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे धारधार कोयता, मिरचीची पूड, नायलॉन दोरी यासह दरोड्यासाठी लागणारे आदी साहित्य आढळून आले. त्यामुळे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरु न पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A gang preparing for a robbery is in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.