शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

जिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 1:28 AM

जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असे वाटत असतानाच मध्येच दडून बसणारा पाऊस, तर कधी धो-धो बरसणाऱ्या तालुक्यात दुसºया दिवशी लख्ख सूर्यप्रकाश अशा विचित्र वातावरणाचा अनुभव सध्या नाशिककरांना येत आहे.

नाशिक : जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असे वाटत असतानाच मध्येच दडून बसणारा पाऊस, तर कधी धो-धो बरसणाऱ्या तालुक्यात दुसºया दिवशी लख्ख सूर्यप्रकाश अशा विचित्र वातावरणाचा अनुभव सध्या नाशिककरांना येत आहे. रविवारी (दि.२१) त्र्यंबकेश्वर वगळता जिल्ह्यात सर्वच ठिकाणी चांगला पाऊस सुरू असताना सोमवारी (दि.२२) मात्र सहा तालुक्यांमध्ये केवळ रिमझिम पाऊस सुरू होता. अनेक तालुक्यांमध्ये तर लख्ख सूर्यप्रकाश पडला होता. हवामान खात्याचे सर्व अंदाज गुंडाळून जिल्ह्णात पावसाचा सुरू असलेला खेळ धरणाच्या पाण्याची चिंता वाढविणारा ठरत आहे.जिल्ह्णात उशिरा आगमन झालेल्या मान्सूनमुळे पावसाची अनिश्चितता अजूनही कायम आहे. गेल्या दि. ७ आणि ८ जुलै रोजी जिल्ह्णात सर्वदूर झालेल्या पावसामुळे सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले होते. दुष्काळाची झळ सोसणाºया तालुक्यांमध्येही पावसाच्या सरी बरसल्याने नदी, नाले वाहू लागले तर दोनच दिवसांच्या पावसाने धरणांची पातळीदेखील वाढली. आता पावसाने जोर धरला असे वाटत असताना पुन्हा दडून बसलेल्या पाऊन अधूनमधून डोकावत असतो तर कधी जोरदार हजेरी लावून दडत आहे. जिल्ह्णात पावसाच्या या लहरीपणामुळे मात्र शेतकरी पीकाविषयी साशंकदेखील झाले आहेत. पेरणीसाठी पूरक असलेला पाऊस झाल्यामुळे एकीकडे समाधान असले तरी पावसाच्या अनिश्चिततेचा फटका याच पिकांच बसू नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्येदेखील पावसाची अनिश्चितता कायम आहे. इगतपुरीत २५ ते ५५ मि.मी. असा बरसणारा पाऊस गेल्या दोन दिवसांपासून १२ ते १५ मि.मी. नोंदला जात आहे. त्र्यंबकेश्वरमध्येही धुमाकूळ घातल्यानंतर गेल्या आठवड्यापासून, तर त्र्यंबकेश्वरमध्येही पावसाने काहीशी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी अपेक्षित पाऊस होऊ न शकल्याने पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांचा हिरमोडही झाला. या महिनाभरात त्र्यंबकेश्वरसह धरणक्षेत्रात देखील पाऊस नसल्यामुळे जुलैच्या मध्यावरच त्र्यंबकला निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे येथील व्यापार, व्यावसायिकांमध्ये चिंता दिसून आली.रविवारी पावसाचे दान; सोमवारी ठणठणाटरविवार (दि.२१) रोजी चोवीस तासांत जिल्ह्णात सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. सर्वच सर्व ठिकाणी बरसलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात चांगलीच धावपळ झाली. दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या तालुक्यांमध्येही पाऊस झाल्यामुळे समाधान व्यक्त होत असताना सोमवारी मात्र सहा तालुक्यांत पावसाचा थेंबडी होऊ शकला नाही. रविवारी सिन्नरमध्ये १७ मि.मी. पाऊस झाला, तर सोमवारी केवळ ५ मि.मी. चांदवडला ६१ मि.मी. बरसल्या पावसाने सोमवारी अक्षरश: दांडी मारली. हीच परिस्थिती येवला, देवळा, नांदगाव, मालेगाव, बागलाण, कळवण आणि सुरगाणा येथील आहे.या ठिकाणी समोवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पाऊसच होऊ शकला नाही. या उलट रविवारी येवल्यात ६७, देवळा ४४, नांदगाव ४५, मालेगाव ९२, बागलाण ३३, कळवण ३६ मि.मी., तर इतका पाऊस बरसला असताना दुसºया दिवशी टिपूसही बरसला नाही. मालेगावमध्ये सर्वाधिक ९२ मि.मी. इतका चांगला दमदार पाऊस बरसला मात्र दुसºयातर दिवशी तालुक्यात कुठेही पावसाने जोर धरला नाही. त्यामुळे शून्य मि.मी. पावसाची नोंद झाली.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती