गाळणे दत्तमंदिरातून पादुका चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 01:24 IST2021-03-20T01:22:45+5:302021-03-20T01:24:11+5:30

मालेगाव तालुक्यातील गाळणे-टिंगरी रस्त्यावरील दत्तमंदिरातून अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीच्या पादुका चोरून नेल्या. वडनेर-खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gadane stole footwear from Datta Mandir | गाळणे दत्तमंदिरातून पादुका चोरीला

गाळणे दत्तमंदिरातून पादुका चोरीला

मालेगाव : तालुक्यातील गाळणे-टिंगरी रस्त्यावरील दत्तमंदिरातून अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीच्या पादुका चोरून नेल्या. वडनेर-खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदुपारी पंचधातूच्या सात किलो वजनाच्या पादुका अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या  आहेत. याप्रकरणी मंदिराचे पुजारी गोकुळ नामदेव देवरे यांनी  फिर्याद दिली आहे. 
या मंदिरात सकाळपासून भाविकांची  दर्शनासाठी गर्दी असते. यामुळे पुजा-यांनी पादुका दानपेटीजवळ  ठेवल्या  होत्या. दुपारी ३ वाजेपर्यंत पादुका होत्या. मात्र, साडेचार वाजेच्या सुमारास पुजारी देवरे मंदिरात गेले असता पादुका आढळून आल्या  नाहीत.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजपूत करीत आहेत.

Web Title: Gadane stole footwear from Datta Mandir