‘फनी’ चक्रीवादळामुळे वातावरणात गारवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:54 AM2019-05-04T00:54:13+5:302019-05-04T00:55:17+5:30

कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना गुरुवारी मध्यरात्रीपासून वाहणाऱ्या थंड वाºयामुळे दिलासा मिळाला आहे. फनी चक्रीवादळामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, हा गारवा आगामी तीन दिवसांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

'Funny' hurts in the atmosphere due to cyclone | ‘फनी’ चक्रीवादळामुळे वातावरणात गारवा

‘फनी’ चक्रीवादळामुळे वातावरणात गारवा

Next
ठळक मुद्देदिलासा : उष्णतेची लाट होतेय कमी

नाशिक : कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना गुरुवारी मध्यरात्रीपासून वाहणाऱ्या थंड वाºयामुळे दिलासा मिळाला आहे. फनी चक्रीवादळामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, हा गारवा आगामी तीन दिवसांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात ४२ अंशांपर्यंत पोहचलेल्या नाशिकच्या तापमानाने नाशिककर भाजून निघाले असताना शुक्रवारी तापमान ३४.७ अंशांवर आल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला. गुरुवारी सायंकाळपासून काहीसे ढगाळ वातावरण आणि गार वाºयाची झुळूक नाशिककर अनुभवत आहेत.
ढगाळ वातावरण शक्य
फनी चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन गार वारे वाहू लागतील तसेच पुढील दोन दिवसांत शहरात ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Web Title: 'Funny' hurts in the atmosphere due to cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.