दिंडोरीच्या जवानावर आज अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 00:49 IST2022-02-17T00:48:28+5:302022-02-17T00:49:41+5:30
अरुणाचल प्रदेशमध्ये लष्करात देशसेवा करताना वाहन अपघात वीरमरण आलेल्या दिंडोरी येथील प्रसाद क्षीरसागर या जवानाचे पार्थिवावर गुरुवार दि.१७ रोजी सकाळी अकरा वाजता सिडफार्म जागेत शासकीय इतमातात अंत्यसंस्कार होणार आहे.

दिंडोरीच्या जवानावर आज अंत्यसंस्कार
दिंडोरी : अरुणाचल प्रदेशमध्ये लष्करात देशसेवा करताना वाहन अपघात वीरमरण आलेल्या दिंडोरी येथील प्रसाद क्षीरसागर या जवानाचे पार्थिवावर गुरुवार दि.१७ रोजी सकाळी अकरा वाजता सिडफार्म जागेत शासकीय इतमातात अंत्यसंस्कार होणार आहे. सकाळी सात वाजता क्षिरसागर यांचे पार्थिव दिंडोरीत येणार असून त्यांचे राहत्या घरी टेलिफोन कॉलनी येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर अंत्य यात्रा निघणार आहे.