धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 17:59 IST2025-08-03T17:58:28+5:302025-08-03T17:59:19+5:30
नाशिकच्या सातपूर परिसरात एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे.

धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
नाशिकच्या सातपूर परिसरात एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. बाकावर बसण्याच्या वादातून हाणामारीत एकाची हत्या करण्यात आली. दहावीत शिकणाऱ्या मित्रांनीच त्याच्या एका मित्राला लाथा बुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शाळेतील वाद खाजगी क्लास पर्यंत पोहोचला आणि त्यानंतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारी झाले. तीन ते चार मित्रांनी त्यांच्याच मित्राला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. एक १६ वर्षीय शाळकरी मुलगा मृत्युमुखी पडला आहे. नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला यात दोन विधी संघर्षीत बालकांना देखील ताब्यात घेतले आहे.
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
मित्रांमधला वाद हा शाळेपासून खाजगी क्लासेस पर्यंत देखील पोहोचला. मात्र या वादाकडे ना पालकांनी लक्ष दिलं ना संबंधित शिक्षकांनी मात्र घटनेनंतर मयत मुलाच्या कुटुंबाकडून खाजगी शिकवणीच्या संस्था मोठ्या प्रमाणात फी घेतात मात्र विद्यार्थ्यांना योग्य सुविधा उपलब्ध होत नाही. मुलांकडे देखील फारसं लक्ष दिलं जात नाही असं मयत मुलाच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. घटनेतील संबंधित विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मयत मुलाच्या कुटुंबाची मागणी आहे.
नाशिकचा सातपूर परिसर हा कामगार वस्तीचा परिसर आहे. मात्र या परिसरात अनेक दिवसांपासून गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. ज्या खाजगी क्लासच्या बाहेर हा प्रकार घडला.
अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न गंभीर
नाशिक शहर पोलीस आयुक्तांकडून शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस आपल्या दारी हा उपक्रम देखील घेण्यात आला. मात्र शहरातील गुन्हेगारी ही थांबण्याचे नाव घेत नाही. शहरातील गुन्हेगारीत सर्वाधिक घटना या अल्पवयीन गुन्हेगारांच्या समोर येत आहेत. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवणे आणि टोकाचे पाऊल उचलणे या घटनांमुळे अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.