Nashik: नाशकात कडाक्याच्या थंडीत भल्या पहाटे सैन्यभरतीसाठी तरुणाई मैदानात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 11:01 IST2025-11-19T11:00:57+5:302025-11-19T11:01:44+5:30
Army Recruitment: शहरात कडाक्याची थंडी असतानाही भल्या पहाटे सैन्यभरतीसाठी राज्यभरातून आलेल्या तरुणांचा सळसळता उत्साह पाहायला मिळाला.

Nashik: नाशकात कडाक्याच्या थंडीत भल्या पहाटे सैन्यभरतीसाठी तरुणाई मैदानात!
नाशिक: शहरात कडाक्याची थंडी असतानाही भल्या पहाटे सैन्यभरतीसाठी राज्यभरातून आलेल्या तरुणांचा सळसळता उत्साह पाहायला मिळाला. देवळाली कॅम्प छावनी परिषदेमधील बाळासाहेब ठाकरे क्रीडा ३०३ जवानांसह इतर १४ पदांसाठी ही भरती सुरू आहे.
...या जिल्ह्यांतील युवकांनी गाळला घाम
अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांतील सुमारे साडेतेरा हजार युवकांनी भरती प्रक्रियेत सहभागी हाेऊन थंडीच्या कडाक्यात घाम गाळला.
आज या जिल्ह्यांमधील युवक जाणार सामोरे
नाशिक, पुणे, मुंबई शहर, बृहन्मुंबई, रायगड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर या दहा जिल्ह्यांमधून हजारो युवक डोळ्यांत सैनिक होण्याचे स्वप्न घेऊन देवळाली कॅम्पमध्ये दाखल होत भरती प्रक्रियेला सामोरे जाणार आहेत.
२८ तारखेला समारोप
पहाटे झुंजूमुंजू होताच मैदानावर भरती प्रक्रियेला सुरुवात होते. येत्या २८ तारखेपर्यंत ती चालणार आहे. १,८०० मीटरचा वर्तुळाकार धावण्याचा टास्क थंडीच्या कडाक्यात निर्धारित वेळेत पूर्ण करणारे उमेदवार पुढील वैद्यकीय चाचणी व लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतात.