प्रवासी भरण्याच्या कारणावरून रिक्षाचालकांमध्ये फ्रिस्टाइल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 18:50 IST2018-09-04T18:48:20+5:302018-09-04T18:50:00+5:30
नाशिक : प्रवासी भरण्याच्या कारणावरून तीन रिक्षाचालकांनी एका रिक्षाचालकास जबर मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़२)रात्रीच्या सुमारास त्रिमूर्ती चौकातील दत्तमंदिर स्टॉपजवळ घडली़

प्रवासी भरण्याच्या कारणावरून रिक्षाचालकांमध्ये फ्रिस्टाइल
नाशिक : प्रवासी भरण्याच्या कारणावरून तीन रिक्षाचालकांनी एका रिक्षाचालकास जबर मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़२)रात्रीच्या सुमारास त्रिमूर्ती चौकातील दत्तमंदिर स्टॉपजवळ घडली़
सिडकोतील हेडगेवार चौकातील आंबेडकर गार्डनजवळ प्रशिक अडांगळे हा रिक्षाचालक राहतो. रविवारी (दि. २) रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास तो त्रिमूर्ती चौकातील दत्तमंदिर स्टॉपजवळ रिक्षामध्ये प्रवासी भरत होता़ त्यावेळी संशयित रिक्षाचालक राहुल सांगळे (रा़उत्तमनगर, सिडको), सुनील उदगिरे व सतीश चौधरी (दोघे रा. राणाप्रताप चौक, सिडको) हे तिथे आले. त्यांनी रिक्षात प्रवासी भरण्याच्या कारणातून प्रशिक अडांगळे यास शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ तसेच संशयितांनी त्याचे हात पकडून त्याच्या डाव्या बरगडीजवळ चाकू मारून जखमी केले.
या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात तिघा रिक्षाचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे़