राज्यातील कैद्यांना मोफत उच्च शिक्षण

By Admin | Updated: May 4, 2017 18:48 IST2017-05-04T18:48:14+5:302017-05-04T18:48:14+5:30

वायुनंदन: मुक्त विद्यापीठाच्या वतीने देणार धडे

Free higher education to the prisoners of the state | राज्यातील कैद्यांना मोफत उच्च शिक्षण

राज्यातील कैद्यांना मोफत उच्च शिक्षण

नाशिक : वेगवेगळ्या गुन्ह्यांबद्दल शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची गुन्हेगारी मानिसकता बदलून त्यांना पुन्हा समाजात एक चांगला नागरीक म्हणून जगता यावे, यासाठी राज्यातील सर्व कारागृहांत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे मोफत उच्च शिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि योग विज्ञान प्रबोधिनी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी आयोजित योग शिक्षक प्रशिक्षण वर्गाचा पारितोषिक वितरण समारंभ गुरूवारी संपन्न झाला. त्यावेळी कुलगुरूंनी ही माहिती दिली.  
 

Web Title: Free higher education to the prisoners of the state