मोबाइल टॉवरच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 19:55 IST2019-01-06T19:55:15+5:302019-01-06T19:55:38+5:30
नाशिक : जियो कंपनीचे मोबाइल टॉवर मंजूर करून आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवून गांधीनगरमधील एका इसमास अकाउंटवर पैसे पाठविण्यास सांगत पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़

मोबाइल टॉवरच्या नावाखाली फसवणूक
नाशिक : जियो कंपनीचे मोबाइल टॉवर मंजूर करून आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवून गांधीनगरमधील एका इसमास अकाउंटवर पैसे पाठविण्यास सांगत पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़
उपनगर पोलीस ठाण्यात सुशीलकुमार सिंह (३५, रा़ मिलिटरी एअरपोर्ट, गांधीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २३ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी दहा वाजता ८७६८८७२७२० या क्रमांकावरून फोन आला़ संशयित माणिक बबलू दंडापात (रा़ बंगुरा, बेलिआबेरा पोलीस ठाणे, जि़ वेस्ट मेडनिपुन) याने तुमच्या जमिनीवर जिओ कंपनीची मोबाइल टॉवर मंजूर होईल व तुम्हाला भरपूर फायदा होईल, असे सांगितले़ तसेच बँकेचा आयएफसी कोड देऊन अकाउंटवर पैसे पाठविण्यास सांगितले़ त्यानुसार सिंह यांनी दोन वेळा ४९ हजार ५०० पाचशे रुपये बँक अकाउंटवर पाठविले़ मात्र, पैसे भरूनही टॉवरसाठी पंधरा लाख रुपये न आल्याने तसेच दिलेले पैसे परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सिंह यांनी उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली़
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पश्चिम बंगाल येथील संशयित माणिक दंडापात या भामट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़