दौलती इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन

By Admin | Updated: January 20, 2016 22:12 IST2016-01-20T22:12:03+5:302016-01-20T22:12:48+5:30

दौलती इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन

Fraternity of the English Medium Medium School | दौलती इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन

दौलती इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन

मालेगाव : येथील दौलती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन झाले. अध्यक्षस्थानी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राम भालसिंग होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक संदीप डिगाणू, विस्तार अधिकारी दिलीप पवार, साहेबराव निकम, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवीदास बच्छाव, कोशाध्यक्ष कमलताई बच्छाव, सचिन बच्छाव, उपाध्यक्ष पूनम बच्छाव उपस्थित होते.
प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. विद्यार्थ्यांनी मनोरंजनात्मक कार्यक्रम, बेटी बचाव, झाडे लावा झाडे जगवा, समानता यावर आधारित नृत्य व नाट्य सादर केले. इ. चौथीतील विद्यार्थिनी राधिका पाटील हिच्या गायनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. याप्रसंगी फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. परीक्षक म्हणून हर्षदा भावसार यांनी काम पाहिले. त्यात ‘मिस स्कूल’ म्हणून रिषिका बच्छाव हिची निवड करण्यात आली.
यावेळी शाळा पातळीवर आदर्श विद्यार्थी व शिक्षक निवडण्यात आले. आदर्श विद्यार्थी म्हणून पूर्व प्राथमिकमधून श्रद्धा शिरसाठ, प्राथमिक स्तरातून रिषिका बच्छाव व आदर्श शिक्षक केतन सूर्यवंशी यांना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन रिषिका बच्छाव, हर्षदा खरात, कीर्ती बागुल, मृदुला पगार यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Fraternity of the English Medium Medium School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.