In four years, 3,000 people polluted the warehouse! | चार वर्षांत ३ हजार लोकांनी केले गोदामाईला प्रदूषित!

चार वर्षांत ३ हजार लोकांनी केले गोदामाईला प्रदूषित!

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये ८८ लोकांवर गुन्हे८२ हजारांचा दंड वसूल कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

नाशिक : नाशिककरांचे अस्तित्व असलेल्या गोदावरी नदीला मागील चार वर्षांमध्ये ३ हजार ८५६ नागरिकांनी प्रदूषित केले. या नागरिकांवर मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. गोदावरीच्याप्रदूषणाला करणीभूत ठरलेल्या बेफिकिर नागरिकांकडून तब्बल ८२ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्येही गोदावरीचे प्रदूषण फारसे नियंत्रणात राहिले नाही. मार्चपासून जुलैपर्यंत ८८ लोकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले.
गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नाशिक महापालिकेला दिले आहेत. यानुसार विभागाीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढवा बैठक आॅनलाइन पध्दतीने मंगळवारी (दि.११) घेण्यात आली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, मनपा उपायुक्त रघुनाथ गावडे, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, याचिकाकर्ते निशिकांत पगारे, राजेश पंडीत आदींनी सहभाग घेतला.


नाशिकरोड येथील पिण्याच्या पाण्याचा साठा प्रदुषण विरहीत करणे, दारणाची उपनदी असलेलया वालदेवी नदीमध्ये होणाऱ्या प्रदूषणावर जिल्हा परिषद व मनपा यांच्याकडून झालेल्या संयुक्त उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळामार्फत मलनिस्सारण प्रकल्प (एसटीपी) तयार करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला असल्याचे या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगितले गेले. हा प्रकल्प अस्तित्वात आल्यास गोदाप्रदूषणावर नियंत्रण मिळविणे अधिक सोपे होणार आहे.
पिंपळगाव खांब व तपोवन परिसरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी पिंपळगाव खांब येथे मलनिस्सारण प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. त्यासाठी लागणारी जागा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भुसंपादित करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी मिसाळ यांनी दिली.

कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
गोदावरीचे गटारीकरण रोखण्यासाठी औद्यागिक वसाहतीतील रासायनिक प्रक्रियायुक्त सांडपाणी नदीपात्रात सातत्याने मिसळत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. याविषयी बोलताना मंडळाच्या पदाधिका-यांनी संबंधित कारखान्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याचे सांगितले; मात्र हे केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार असल्याचे गोदाप्रेमी पंडित, पगारे यांनी बोलून दाखविले.

Web Title: In four years, 3,000 people polluted the warehouse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.