चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 01:14 IST2021-03-22T01:14:26+5:302021-03-22T01:14:47+5:30
आडगाव पोलीस ठाणे हद्दीत एका चार वर्षीय चिमुरडीवर २८ वर्षीय युवकाने खाऊचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
पंचवटी : आडगाव पोलीस ठाणे हद्दीत एका चार वर्षीय चिमुरडीवर २८ वर्षीय युवकाने खाऊचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या आईने याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित भगतसिंग मोतीलाल लोदवाल (रा. नांदुरनाका) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
पीडित चिमुकलीच्या घरी कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत संशयित लोदवाल याने खाऊ देण्याच्या बहाण्याने चिमुकलीवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तिने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत लोदवालविरुध्द फिर्याद दिली. फिर्यादीनुसार पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आहे.