जेऊर शिवारात चौघांची भीषण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:28 IST2020-08-08T01:27:54+5:302020-08-08T01:28:23+5:30

नांदगावपासून काही अंतरावर असलेल्या वाखारी शिवारात चव्हाण कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी या चौघांची भीषण हत्या करण्यात आली. शुक्रवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसर हादरला आहे. घटना आर्थिक व्यवहार किंवा अनैतिक संबंधातून घडली असावी, असा पोलिसांना संशय आहे. अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Four were brutally murdered in Jeur Shivara | जेऊर शिवारात चौघांची भीषण हत्या

जेऊर शिवारात चौघांची भीषण हत्या

ठळक मुद्देएकाच कुटुंबातील चौघे : मृतात दोन बालकांचा समावेश; मालेगाव तालुक्यातील थरार

मालेगाव : नांदगावपासून काही अंतरावर असलेल्या वाखारी शिवारात चव्हाण कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी या चौघांची भीषण हत्या करण्यात आली. शुक्रवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसर हादरला आहे. घटना आर्थिक व्यवहार किंवा अनैतिक संबंधातून घडली असावी, असा पोलिसांना संशय आहे. अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाधान अण्णा चव्हाण (३५), भारती समाधान चव्हाण (२६), आराध्या समाधान चव्हाण (७) व अनिरुद्ध समाधान चव्हाण (५)
(सर्व रा. जेऊर) हे ओट्यावर झोपले होते. त्यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार हत्याराने मानेवर, डोक्यावर, हातावर वार करून त्यांची निर्घृण हत्या केली.
रक्षाबंधनाच्या दिवशी नियोजन करून हत्या केल्याचा संशय असून, घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल होत त्यांनी तपासाला प्रारंभ केला आहे. पोलिसांना घटनास्थळापासून काही अंतरावर रक्ताने माखलेला कुºहाडीचा लाकडी दांडा मिळून आला आहे.
समाधान चव्हाण हा रिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत होता. परंतु गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे त्याचा रिक्षा व्यवसाय बंद असल्याने त्यांना आर्थिक चणचण जाणवत असल्याची चर्चा होती. संशयितांनी त्यांची हत्या का केली याचा उलगडा उशिरापर्यंत होऊ शकला नव्हता.

Web Title: Four were brutally murdered in Jeur Shivara