शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
3
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
4
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
5
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
6
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
7
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
8
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
9
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
10
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
11
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
12
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
13
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
14
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
15
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
16
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
17
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
18
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
19
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
20
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नागरेसह चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By admin | Updated: January 3, 2017 21:53 IST

१ कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणात पोलीस कोठडीतील संशयित संदीप सस्ते, छबू नागरे, रामराव पाटील व कृष्णा रामस्वरूप अग्रवाल या चौघा संशयितांची

ऑनलाइन लोकमत 
नाशिक, दि. 3  १ कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणात पोलीस कोठडीतील संशयित संदीप सस्ते, छबू नागरे, रामराव पाटील व कृष्णा रामस्वरूप अग्रवाल या चौघा संशयितांची मंगळवारी (दि़३) न्यायाधीश डी़व्ही देढीया यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ या चौघांचीही पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते़ दरम्यान, संशयित अग्रवालकडून पोलिसांनी संगणकाचा सीपीयु व हार्ड डीस्क जप्त केली आहे़
पुणे आयकर विभागाच्या माहितीनुसार आडगाव पोलिसांनी २२ डिसेंबरला मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्रासमोर तीन आलिशान कार अडवून ११ संशयितांकडून १ कोटी ३५ लाख रुपयांच्या पाचशे व एक हजार रुपयांच्या बनावट नोटा, तर १़८० लाख रुपयांच्या जुन्या चलनातील नोटा जप्त केल्या होत्या़ पोलिसांनी संशयित नागरेच्या खुटवडनगरमधील आॅसम ब्यूटिपार्लरमधून बनावट नोटा छापण्यासाठीचे प्रिंटर, स्कॅनर, कटर मशीन, शाई, कागद जप्त करण्यात केले़ तसेच बँकेतील सुमारे ५८ लाखांची रक्कमही शोधून काढली़
पोलिसांनी अटक केलेल्या अकरा संशयितांपैकी रमेश पांगारकर, संतोष गायकवाड, डॉ़ प्रभाकर घरटे, ईश्वर परमार, नीलेश लायसे, गौतम जाधव, प्रवीण मांढरे, राकेश कारखूर यांची बारा दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सोमवारी (दि़२) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ तर उर्वरीत संशयित संदीप सस्ते, छबू नागरे, रामराव पाटील-चौधरी व पोलिसांना शरण आलेल्या कृष्णा अग्रवाल यांना आणखी एक दिवसांंची पोलीस कोठडी सुनावली़ या चौघांचीही कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते़ पोलिसांनी केलेल्या तपासात नागरे व पाटील हे नोटा छपाईतील प्रमुख सूत्रधार तर अग्रवाल टेक्निशियन असल्याचे समोर आले आहे़ तसेच आणखी ८० कोटी रुपयांच्या नोटा छापण्याच्याही त्यांची तयारी होती़
दरम्यान, पोलिसांनी बनावट नोटांसाठीचा कागद कुठून आणला, कटर मशीनची खरेदी कोठून केली याचा तपास पूर्ण केला आहे़ तसेच येत्या चार दिवसांत या प्रकरणात आणखी मोठा खळबळजनक गौप्यस्फोट होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़ या प्रकरणातील बाराही संशयितांची आता नाशिकरोड कारागृहात रवानगी करण्यात आली आहे़(प्रतिनिधी)
 अग्रवाल  हा बनावट नोटांचा टेक्निशियन
पोलीस कोठडीतील संशयित कृष्णा रामस्वरूप अग्रवाल (३५, रा़ रुद्राक्ष सोसायटीच्या बाजूला, कामगारनगर, सातपूर) याच्याकडे पोलिसांनी स्वतंत्र चौकशी केली़ त्यामध्ये बनावट नोटा छपाईचे काम छबू नागरे करीत असला तरी यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक सहाय्य अर्थात टेक्निकल एक्स्पर्टचे काम अग्रवालचे होते़ त्याच्याकडून पोलिसांनी नोटा स्कॅनिंग करण्यासाठी वापरलेला सीपीयु व हार्डडीस्कही जप्त करण्यात आली आहे़ तसेच अग्रवाल हा पुर्वी झेरॉक्स मशीन चालवत असल्याचेही समोर आले आहे़