Four passengers injured due to reckless bus driving; Offense against the driver | बेदरकारपणे बस चालविल्याने चार प्रवासी जखमी ; चालकाविरोधात  गुन्हा
बेदरकारपणे बस चालविल्याने चार प्रवासी जखमी ; चालकाविरोधात  गुन्हा

ठळक मुद्देनिष्काळजीपणे बस चालविल्याने चार प्रवासी जखमी गतीरोधकावरून बस आदळल्याने प्रवाशांना दुखापत सरकारवाडा पोलीस ठाण्याच चालका विरोधात गुन्हा

नाशिक : शहरातील बसचालकांच्या बेदरकारपणामुळे  रस्त्यावरील प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवासा क रावा लागत असतान बुधवारी (दि.१८) रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा बेजबाबदारपणे वाहन चालविल्याने चार प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बसचालकाविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरीलिंरोड परिसरातील कालिकानगरचे किशोर भगवान राणभरे यांनी बस चालकाविरोधात फिर्याद दिली आहे. ते मुंबई- आग्रा रोड जिल्हाधिकारी कार्यालय येथून जात असताना संशयित आरोपी बसचालक संदीप रघुनाथ वाबळे (५१) याने त्याच्या ताब्यातील बस क्रमांक एमएच १५ ए के ८०२६ रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व अविचाराने भरधाव वेगाने चालवित जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील गतिरोधकावर आदळली. त्यामुळे बसमधील प्रवासी अनिल फारनसिंग यादव, पूजा कारभारी पगारे, साधना विजय मोहिते, कोमल संतोष मोहिते आदी प्रवाशांच्या डोक्याला मणक्याला, खांद्याला व हातापायाला मुक्का मार लागला म्हणून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


Web Title: Four passengers injured due to reckless bus driving; Offense against the driver
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.