शहरातून चार दुचाकींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:25 IST2018-10-31T00:25:36+5:302018-10-31T00:25:53+5:30
शहरातील दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ पंचवटी, म्हसरूळ व गंगापूर परिसरांतील चार दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहनचोरट्यांनी उच्छाद मांडल्याने वाहनधारकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे़

शहरातून चार दुचाकींची चोरी
नाशिक : शहरातील दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ पंचवटी, म्हसरूळ व गंगापूर परिसरांतील चार दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहनचोरट्यांनी उच्छाद मांडल्याने वाहनधारकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे़
पंचवटीतील परशुराम पुरिया अपार्टमेंटमधील रहिवासी गौतम अमरसिंग गौसर यांची २५ हजार रुपये किमतीची पॅशन दुचाकी (एमएच १५ एटी ४७७७) चोरट्यांनी शनिवारी (दि़२७) रात्री अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरून नेली़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पेठरोड परिसरातील रहिवासी संजय बलभिम पठारे (रा.वेदनगरी समोर,मेघराज बेकरी) यांची ३० हजार रुपये किमतीची सुझुकी दुचाकी (एमएच १६ बीए ३१८८) चोरट्यांनी घराच्या पार्किंगमधून चोरून नेली़ याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतून दोन दुचाकींची चोरी झाली आहे़ शिवाजीनगरमधील कृष्णा हाइटसमधील रहिवासी राजेंद्र विश्वनाथ पाटील यांची ४० हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी (एमएच १८ एजी ६१८३) चोरट्यांनी इमारतीच्या पार्किंगमधून चोरून नेली,तर शिवाजीनगरमधील रहिवासी देवेंद्र निलकंठ पवार यांची ३० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर (एमएच १५ डिआर ५७४४) दुचाकी चोरट्यांनी थत्तेनगरमधील माहेश्वरी किराणासमोरील रूपाली अपार्टमेंटमधून चोरून नेली़ याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़