सुदैवाने सर्व ४९ प्रवासी सुखरूप बचावले; तारवालानगर चौकात बस-ट्रकचा भीषण अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 17:38 IST2019-12-13T17:35:18+5:302019-12-13T17:38:11+5:30
दिंडोरी रोडवरील तारवालानगर सिग्नल चौफुलीवर अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास परिवहन महामंडळाची बस व मालवाहू ट्रक यांच्यात जोरदार धकड होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली.

सुदैवाने सर्व ४९ प्रवासी सुखरूप बचावले; तारवालानगर चौकात बस-ट्रकचा भीषण अपघात
नाशिक : दिंडोरी रोडवरील तारवालानगर सिग्नल चौफुलीवर अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास परिवहन महामंडळाची बस व मालवाहू ट्रक यांच्यात जोरदार धकड होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. बसमधे बसललेले सर्व ४९ प्रवासी सुखरुप असून त्यांना कोणतीही दुखापत न झाल्याने सर्व प्रवाशी बचावले आहेत.
तारवालानगर चौकात पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा बस व मालवाहू ट्रक यांच्यात जोरदार धकड झाली असून येथील अपघातांच्या मालिकेत आणखी एक अपघात जोडला गेला आहे. या ठिकाणी नेहमी अपघात होत असताना शहरातील वाहतूक पोलीस व महानगरपालिका यांच्याकडून आपसी सनन्वयातून कोणतीही ठोस उपाय योजना होत नसल्याने याठिकाणी वारंवार अपघात होण्याचे प्रमाण सुरूच असून अनेकदा अपघातांमध्ये जीवीत हानीही झालेली आहे. असे असतानाही धोकादायक बनलेल्या याभागात वाहन चालकांकडून सातत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघनामुळे अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार शुक्रवारी पहाटेच्या सूमारास घडला आहे. दिंडोरीरोडने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नाशिक कळवण बस क्रमांक एमएच १४ बीटी ०७७४ दिंडोरीरोडने जात असताना त्याचवेळी चौफुलीवर मालवाहू ट्रक क्रमांक आर जे ३० जीए ०८९७ बसवर येऊन धडकला. सुदैवाने दोन्ही वाहनांच्या चालकांनी प्रसंगावधान दाखवून वाहने नियंत्रित केल्याने मोठा अपघात टळला. त्यामुळे बसमधील सुमारे ४९ प्रवासी बचावले. अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही त्यामुळे बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहे. दरम्यानन, तारवालानगर सिग्नल येथे झालेल्या अपघाताचे चित्रण परिसरात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहे.दिंडोरीरोड परिसरात वारंवार घडणाºया अपघातामुळे अनेकांचा जीव गेला आहे त्यामुळे आता तरी प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.