मनमाडचे माजी उपनगराध्यक्ष बागरेचा यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:39 IST2020-03-26T23:39:31+5:302020-03-26T23:39:45+5:30
मनमाड : येथील पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष डॉ. सी. एच. बागरेचा यांना संथारा मरण प्राप्त झाले. शहरातील विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

मनमाडचे माजी उपनगराध्यक्ष बागरेचा यांचे निधन
मनमाड : येथील पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष डॉ. सी. एच. बागरेचा यांना संथारा मरण प्राप्त झाले. शहरातील विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. माजी नगरसेवक डॉ. सुनील बागरेचा यांचे ते वडील होत. सध्याच्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीचा विचार करता कोणत्याही दुखवटा बैठकीचे आयोजन नसल्याचे अमृत मित्र परिवाराच्या वतीने सांगण्यात आले आहे.