कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलच्या  माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:46 PM2019-03-13T23:46:16+5:302019-03-14T00:06:58+5:30

येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलमधून १९७७ साली दहावीमध्ये असलेल्या व सध्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तत्कालीन तब्बल ४२ वर्षांनी आपले शालेय जीवन पुन्हा अनुभवले.

 Former students of Cantonment Board High School join | कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलच्या  माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलच्या  माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

Next

देवळाली कॅम्प : येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलमधून १९७७ साली दहावीमध्ये असलेल्या व सध्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तत्कालीन तब्बल ४२ वर्षांनी आपले शालेय जीवन पुन्हा अनुभवले.
तत्कालीन ३२ विद्यार्थ्यांनी शाळेला भेट देत विद्यमान मुख्याध्यापक नलिनी लोखंडे यांचा सत्कार केला. प्रकाश आडके, मुन्ना वाघुळकर यांनी बांधकाम, विवेक धवसे यांनी वैद्यकीय व्यवसायात भरारी घेतली आहे. रमेश मांडे, राजेंद्र जाधव, सुनील बकरे, अरुण निकम, सुनील बागुल, रमेश कासार, प्रमोद भालेराव, किशोर अहिरे, सुभाष परमाळ, रमेश शिंदे यांनी प्रशासकीय सेवेत तर सुदाम आडके व सुकदेव आडके यांनी कृषी क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. प्रास्ताविकातून सुधाकर गोडसे यांनी या स्नेहमेळाव्याचा उद्देश कथन केला.
याप्रसंगी व्यावसायिक बाळासाहेब खैरनार, भगवान काथे, बहिरू बोराडे, विष्णू जोशी, किशोर आहिरे, राजा गोडसे, बुद्धास साळवे, रामचंद्र बिºहाडे, सुनील माळवे आदी उपस्थित होते.  सद्यस्थितीत हे सर्व माजी विद्यार्थी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात अग्रेसर असून, कालच्या मेळाव्यात सर्वांनी एकमेकांच्या सुख-दु:खाची आपुलकीने दखल घेतली व आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. गोविंद बागुल, अशोक जगताप, सुरेंद्र चौधरी यांनी मनोगतातून गत आठवणींना उजाळा दिला. रमेश भवार यांनी आपल्यातील शीघ्र कवीचे दर्शन घडविले.

Web Title:  Former students of Cantonment Board High School join

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.