शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

माजी विद्यार्थ्याकडून प्राध्यापिकेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:52 IST

शहरातील एका महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्याने विवाहिता प्राध्यापकाच्या कपाळावर बळजबरीने कुंकू लावत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नाशिक : शहरातील एका महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्याने विवाहिता प्राध्यापकाच्या कपाळावर बळजबरीने कुंकू लावत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.  पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित विवाहिता प्राध्यापक गंगापूर रोडवरील एका महाविद्यालयात नियमितपणे प्रयोगशाळेत कर्तव्य बजावत असताना सोमवारी (दि.२१) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास संशयित योगेश रमेश जावळे (२९, रा. चव्हाणके टॉवर, मखमलाबाद नाका) याने पीडित विवाहितेसोबत फोनवर संपर्क साधत व प्रत्यक्ष भेटून लग्नाची मागणी घातली. विवाहितेने नकार दिल्याचा राग येऊन जावळे याने थेट प्रयोगशाळेत विवाहितेचा हात धरला ‘तू माझ्यासोबत लग्न कर’ असे सांगून खिशातून कुंकवाची पुडी काढत कपाळावर कुंकू लावण्याचा प्रयत्न केला; मात्र विवाहितेने त्याच्या हाताला जोरदार हिसका दिल्याने कुंकू जमिनीवर पसरला. यावेळी झालेल्या आरडाओरडीचा व साहित्य पडण्याच्या आवाजाने पीडितेला सोडविण्यासाठी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. दरम्यान, संशयित जावळे याने कर्मचाºयांना धक्काबुक्की करत मारहाणीचा प्रयत्न केल्याचे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी संशयित जावळेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, त्यास अटक करण्यात आली आहे.काही तासांत अटकपोलिसांनी मंगळवारी (दि.२२) संध्याकाळी योगेश जावळे यास अवघ्या काही तासांत अटक करून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, घडलेला प्रकार अत्यंत निंदणीय असल्याची संतप्त भावना शिक्षकवर्गातून उमटल्या.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी