माजी महापौर दशरथ पाटील यांचा मुलगा बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 22:38 IST2025-12-08T22:34:41+5:302025-12-08T22:38:05+5:30
गंगापूर पोलीस ठाण्यात रोहीत पवार यांच्या बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

माजी महापौर दशरथ पाटील यांचा मुलगा बेपत्ता
नाशिक- पेट्रोल पंपावरील भरण्याची रक्कम घेऊन आलेला माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र राेहीत (वय २८) आपल्या चालकाकडे मोटार आणि भरण्याची रक्कम देऊन सातपूरच्या पाईपलाईन भागातून गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. बीपीसीएलच्या बैठकीसाठी जात अससल्याचे सांगून पायीच ते चालत निघून गेल्याचे चालकाने सांगितले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात रोहीत पवार यांच्या बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दशरथ पाटील हे २००२-०३ या काळात शिवसेनेचे महापौर होते. त्यानंतर ते अनेक पक्षात होते. दरम्यान, आता राजकीय रणधुमाळी सुरू होत असतानाच ही घटना घडली आहे. पोलीसांनी विविध पथकांच्या माध्यमातून रोहीत यांचा शोध सुरू केला आहे.